मनोजभाऊ जरे युवा मंचतर्फे रविवारी समाज भूषण पुरस्काराचे आयोजन
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी (दि. २७ मे २०२२) मनोज भाऊ जरे युवा मंच व नारी शक्ति महिला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (दि. २९ मे) विविध क्षेत्रातील अनमोल रत्नांचा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. चिखली म्हेत्रे वस्ती येथील म्हेत्रे उद्यानात सायंकाळी सहा वाजता खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे अशी माहिती मनोजभाऊ जरे युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष आणि युवा उद्योजक मनोज जरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
छत्रपती संभाजी महाराज व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त खा. अमोल कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थदादा पवार,राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर आणि ज्येष्ठ उद्योजक वसंतशेठ जरे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात काम करणाऱ्या गुणवंत व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे.
या पुरस्कार सोहळ्याला मावळचे आमदार सुनील आण्णा शेळके, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, वडगाव शेरीचे आमदार सुनीलअण्णा टिंगरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, माजी महापौर योगेश बहल, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर, माजी आमदार विलास लांडे, पारनेरचे आमदार निलेश लंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी महापौर मंगलाताई कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष इम्रान शेख, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष यश दत्ताकाका साने, महापालिका आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, नगरसेवक प्रवीण भालेकर, युवा उद्योजक सचिनशेठ जरे, शिवलिंग जरे, पुणे छावा क्रांती सेना युवक अध्यक्ष विजयभाऊ जरे, युवा नेते किशोरभाऊ मासाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या पुरस्कार सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे यावेळी तब्बल २५० पेक्षा जास्त व्यक्तींना पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याचे मनोज जरे यांनी सांगितले. 'समाजभूषण' पुरस्कारांतर्गत नऊ विविध विभागांसाठी हे पुरस्कार दिले जाणार आहेत. आपल्या अवतीभवती अनेक लोक कोणतीही अपेक्षा न करता समाजाच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी काम करत असतात. समाजाच्या विकासात पर्यायाने शहराच्या विकासात या लोकांची मोलाची मदत मिळत असते. अशाच विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान मंडळींना गौरविण्यासाठी आमच्या मंचाने पुढाकार घेतला असून यापुढेही हे कार्य असेच सुरू ठेवणार असल्याचे मनोज जरे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस मनोज जरे, उद्योजिका आणि सामाजिक कार्यकर्त्या व नारी शक्ति महिला मंचच्या अध्यक्षा निलिमाताई जरे उपस्थित होत्या.