अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांचे 'थुंकी मुक्त रस्ता अभियान'

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

 शर्मिला ठाकरे, उदयनराजे भोसले, प्रसाद लाड 
यांच्यासह अनेकांचा अभियानाला पाठिंबा 
          पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  - जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवाचे औचित्य साधून 'थुंकी मुक्त रस्ता अभियान' राबविले असून, समाजातील विविध स्तरातून या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, उदयनराजे भोसले, भाजपचे आमदार प्रसाद लाड, उद्योजक विजय जगताप, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे यांच्यासह अनेकांनी या अभियानाला पाठिंबा दर्शवला आहे. 
           अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव यांनी सांगितले, की आज सर्वच रस्त्यांवर थुंकून रस्ते घाण झालेले पाहवयस मिळतात. हे चित्र समाजिक आरोग्याच्या दृष्टीने चांगले नाही. म्हणून लोकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने आमच्या प्रशालेचे विद्यार्थी रस्त्यावर कुणी थुंकताना दिसले तर या लोकांना 'रस्त्यावर थुंकू नका', असे सांगतील. मात्र, तरीही त्या व्यक्तीने ऐकले नाही, तर विद्यार्थी आजूबाजूच्या लोकांना रस्त्यावर थुंकणाऱ्या व्यक्तीविषयी तक्रार करतील. जेणेकरून रस्त्यावर थुंकणाऱ्य व्यक्तीला संकोचल्यासारखे होईल. अशाप्रकारे हे अभियान कायमस्वरूपी चालणार आहे. हे अभियान 'थुंकी मुक्त रस्ता' चळवळ होण्यासाठी इतर शाळा, महाविद्यालये, नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन अरविंद एज्युकेशन सोसायटी प्रशाळेच्या या अभियानाला पाठींबा द्यावा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, उदयनराजे भोसले, भाजपचे आमदार प्रसाद लाड, उद्योजक विजय जगताप, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे यांच्यासह अनेकांनी या अभियानाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे या अभियानाला चळवळीचे स्वरूप प्राप्त व्हायला सुरुवात झाली आहे, ही स्वागतार्ह गोष्ट आहे.
          रस्त्यावर थुंकणाऱ्यांनीही आपल्यामुळे रस्ते विद्रुप होणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी. रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या, तसेच आपल्या चपलांच्या माध्यमातून ही थुंकी घरापर्यंत येऊन पोहोचते. त्यामुळे आपल्याच कुटुंबाचे आरोग्य बिघडते. हे टाळण्यासाठी विद्यार्थ्यांसोबतच समाजातील सर्व घटकांनी 'थुंकीमुक्त रस्ते' कसे होतील, या दृष्टीने जनजागृती करायला हवी. 
आज रस्त्यांची अवस्था बघितली, तर 
परदेशात गेल्यावर आपण तिथल्या रस्त्यांवर थुंकत नाही, मग आपल्याच इथल्या रस्त्यावर थुंकून इथले रस्ते का खराब करता ? 'थुंकीमुक्त रस्ते अभियाना'ला सर्वच शाळा, महाविद्यालयांनी पाठिंबा दर्शवून या अभियानात सहभागी व्हायला हवे. तरच या अभियानाचे 'थुंकीमुक्त रस्ते चळवळी'त रूपांतर होऊन रस्ते चकाचक दिसतील. पर्यायाने समाजाचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. 
           -आरती राव, अध्यक्षा, अरविंद एज्युकेशन सोसायटी, जुनी सांगवी.
 अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी राबविलेले 'थुंकीमुक्त रस्ता अभियान' ही आजच्या समाजाची गरज आहे. आपलं घर जसं स्वच्छ ठेवतो तसा आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. जर तुम्हाला कुणी रस्त्यावर थुंकताना दिसलं, तर 'कृपया रस्त्यावर थुंकू नका', असे आवाहन त्यांना करा. सर्वांनी या अभियानात सहभागी व्हावे. 
        -शर्मिला ठाकरे 
थुंकीमुक्त रस्ते अभियानातून खऱ्या अर्थाने स्वच्छ भारत, सुंदर भारत, निरोगी भारत निर्माण होण्यास मदत होणार आहे. राज्यभरातील शाळांनी या अभियानात सहभाग घ्यायला हवा, असे आवाहन करतो.
        -प्रसाद लाड, आमदार