कसब्यात होणार भाजप व काँग्रेस यांच्यात थेट लढत; दाभेकर यांनी माघार घेतली
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे (प्रबोधन न्यूज) - काँग्रेसमध्ये बंडखोरी करत बाळासाहेब दाभेकर यांनी मंगळवारी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांना आता हा अर्ज मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे. दाभेकर यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी दाभेकर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. नारायण पेठेतील मोदी गणपती मंदिरपासून अप्पा बळवंत चौक मार्गे दुचाकी फेरी काढण्यात आली होती. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार आमदार संग्राम थोपटे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, धनंजय वाडकर, अभय छाजेड, कमल व्यवहारे, अजित दरेकर, रफिक शेख, मेहबूब नादाफ यांनी दाभेकर यांच्याशी चर्चा केली. पक्षाच्या वतीने तुम्हाला पुढे संधी देण्यात येईल असेही सांगण्यात आले. आज अखेर पक्षश्रेष्ठींचे ऐकून कसबा विधानसभा पोटनिवडणूकीतून दाभेकर यांनी माघार घेतली आहे.
सलग ४० वर्षे काम करत असूनही पक्ष विचार करत नसेल तर मग असा निर्णय घेण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही, असे सांगत बाळासाहेब दाभेकर यांनी बंडखोरी करीत अर्ज भरला होता. पण आता त्यांनी पक्षासोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे.