लाल महालात लावणी नाच केल्याने वैष्णीवीवर गुन्हा दाखल

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

लाल महालात लावणी नाच केल्याने वैष्णीवीवर गुन्हा दाखल

पुणे, दि. 21 मे - छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य राहिलेल्या लाल महालात लावणीवर नृत्य केल्याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठी कलाकार वैष्णवी पाटील यांच्यासह दोन अनोळखी व्यक्तींविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाल महालाचा रखवालदार राकेश विनोद सोनवणे (वय 37) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. लाल महाल या पवित्र वास्तूचे पावित्र्य भंग केले म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रखवालदार राकेश सोनवणे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे, त्यांनी म्हटले आहे की लाल महाल या पवित्र वास्तूचे पवित्र्य भंग करण्यात आलं आहे. लावणीवर नृत्य करीत असताना मी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु मला माझे काम करू न देता त्यांनी व्हिडीओ शूट केला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील बोबडे अधिक तपास करत आहेत.

पुण्यातल्या ऐतिहासिक लाल महालात लावणीचं शुटिंग केल्याने वाद निर्माण झाला आहे. संभाजी ब्रिगेडने या प्रकरणी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस आयुक्तांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. लाल महालात चंद्रा या गाण्यावर वैष्णवी पाटील या महिला नृत्य कलाकाराने लावणी केली होती. त्यावरूनच हा वाद निर्माण झाला.

दरम्यान, या प्रकरणी अनेक नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. “पुण्यातला शिवाजी महाराजांचा लाल महाल ही वास्तू नाच गाण्यांचे चित्रीकरण करण्याची जागा नव्हे. यापुढे हे होता कामा नये. कोणी केले असेल तर वापरू नका”, असं जितेंद्र आव्हाड आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

या सर्व प्रकरणी आता वैष्णवी पाटील आणि तिच्या भावाने माफी मागितली आहे. वैष्णवीने इंस्टाग्राम अकाऊंटवर लाईव्ह येत माफी मागितली आहे. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद हवे आहेत. मला तुम्हाला कुणालाही दुखवण्याचा हेतू नव्हता मी हात जोडून सगळ्यांची माफी मागते असंही वैष्णवीने आणि तिच्या भावाने माफी मागितली आहे. तसंच या सगळ्यामध्ये कोणत्याही राजकीय पक्ष किंवा नेत्याचा हात नाही. त्यामुळे या सगळ्यावरून राजकारण होऊ नये अशीही अपेक्षा आम्ही व्यक्त करतो असंही या दोघांनी म्हटलं आहे.