…तर मी आमदारकीचा राजीनामा देईन - हसन मुश्रीफ

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

…तर मी आमदारकीचा राजीनामा देईन - हसन मुश्रीफ

कोल्हापूर (प्रबोधन न्यूज) - पश्चिम महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक समाजाचे नेते आणि शरद पवार यांचे निष्ठावंत असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज ईडीने धाड टाकल्यामुळे एकच खळबळ उडाली. “माझ्यावर केलेल्या सर्व आरोपांपैकी एक जरी आरोप खरा ठरला तर मी आमदारकीचा राजीनामा देईन.” असं आव्हानंच यावेळी हसन मुश्रीफ यांनी दिलंय. ट्विटर एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी हे आव्हान दिलंय.

हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्य़ातील घरांवर ईडीने ११ जानेवारी २०२३ रोजी छापे मारले होते. मात्र त्यामध्ये काहीच सापडले नाही. कारखान्यातील ९८ टक्के पैसा हा मनी लाँडरींगच्या माध्यमातून जमवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घोटाळ्यात मुश्रीफांचे जावई मतीन मंगोली यांचाही सहभाग असल्याचं सांगण्यात येत आहे. हा कारखाना काही वर्षांपूर्वी ब्रिस्क इंडिया कंपनीला विकण्यात आला होता. ब्रिस्क इंडिया ही कंपनी जावई मंगोलींच्या मालकीची आहे. व्यवहारासाठी कोलकाता येथील बंद पडलेल्या कंपन्यांच्या नावाने बोगस खाती तयार केली आहेत. या बोगस खात्यांमध्ये टाकलेले पैसे ब्रिस्क इंडिया कंपनीत वळवल्याचा आरोप करण्यात आला होता.

भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपानंतर हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीची छापेमारी सुरू झाली असून यावर आता हसन मुश्रीफ यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. यावेळी बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, “सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यासाठी मी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडून कोणतेही कर्ज घेतलेले नाही.काही गैरसमज असतील तर माजी खासदार किरीट सोमय्या यांनी समोरासमोर बसून माहिती घ्यावी” असा टोला हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे. “हे निव्वळ माझ्या बदनामीचे षडयंत्र आहे” असा आरोपही हसन मुश्रीफ यांनी केलाय.