उस्मानाबादमध्ये बैलाचा जमावात घुसून उत्पात, १४ जण जखमी, (2 व्हिडिओ)

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

उस्मानाबादमध्ये बैलाचा जमावात घुसून उत्पात, १४ जण जखमी, (2 व्हिडिओ)

उस्मानाबाद (प्रबोधन न्यूज) - उस्मानाबाद जिल्ह्यात उरूसाच्या दरम्यान जमावात  बैल घुसल्याने भीषण चेंगराचेंगरी झाली. मिळालेल्या माहितीनुसार, चेंगराचेंगरीत 14 जण जखमी झाले आहेत. सध्या जखमींना तत्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तेथे डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व जखमींची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे. ही घटना आज सकाळची आहे.

प्राप्त माहितीनुसार, आज उस्मानाबाद शहरातील दर्गाह हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी रहमतुल्ला अलैही येथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथे आज दर्ग्याजवळ मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते. या सगळ्यात अचानक एक बैल अनियंत्रित झाला आणि इकडे तिकडे पळू लागला. त्याचवेळी बैलाची ही कृती पाहून लोकही घाबरले आणि त्याला टाळण्याच्या प्रयत्नात चेंगराचेंगरी झाली. त्याचवेळी बैलाच्या हल्ल्यामुळे काही जण जखमीही झाले.

आता या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये दर्गा दिव्यांनी सजवण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे. जिथे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तेवढ्यात अचानक एक पांढरा बैल कुठून तरी गर्दीत शिरला. तो इकडे तिकडे धावू लागतो. गर्दीत घुसून लोकांना ढुशा देऊन बैल आणखी गर्दीत आतपर्यंत शिरतो. बैल बेभानपणे पुढे सरकत असताना अनेकजण त्याच्या तावडीत सापडतात. अनेक जण जमिनीवर पडलेलेही दिसत आहेत. त्याच वेळी, अनेक लोक त्याच्या पायाने वाईटरीत्या चिरडले जातात. सध्या सर्व जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

https://twitter.com/i/status/1623545568999120898