टीम एम्बुषचे कांदा काढणी यंत्र देशात द्वितिय

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

टीम एम्बुषचे कांदा काढणी यंत्र देशात द्वितिय
टीम एम्बुषचे कांदा काढणी यंत्र देशात द्वितिय
टीम एम्बुषचे कांदा काढणी यंत्र देशात द्वितिय

पिंपरी, - पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयातील टीम एम्बुषने "टिफन (TIFAN) २०२२" म्हणजेच टेक्नॉलॉजी इन्होवेशन फोरम फॉर एग्रीकलचरल नर्चरींग या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन भारतात प्रथम पाचमध्ये स्थान मिळवले व सोबतच “बेस्ट सेल्स अँन्ड मार्केटिंग” गटाचे रोख बक्षीस, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह सह व्दितीय क्रमांक मिळवला. या वर्षी देखिल ही स्पर्धा एस.ए.इ. (सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स) इंडिया व जॉन डिअर इंडिया प्रा. लि. यांनी संयुक्तरित्या आयोजीत केली होती. यात संपूर्ण भारतातील अभियांत्रिकीचे विद्यार्थी सहभागी होतात व कार्यक्षम शेती प्रक्रियेसाठी विविध कृषी उपकरणे प्रात्यक्षिक तयार करून सादर करतात. या वर्षी देखिल “कांदा काढणी यंत्र” हीच थीम होती.

ही स्पर्धा या वर्षी फिजीटल माध्यमात घेण्यात आली होती. ह्या फिजीटल माध्यमात व्हर्चुअल क्वॉलिफाईंग राऊंड व स्टॅटिक राऊंड हा ऑनलाईन माध्यमात घेण्यात आला होता व डायनामिक राऊंड हा भौतिक माध्यमात घेण्यात आला होता. डायनामिक राऊंड हा सहभागी झालेल्या वैयक्तिक महाविद्यालयांमध्ये घेण्यात आला व टिफनच्या निरीक्षकांनी वैयक्तिक महाविद्यालयांना भेट देऊन विविध चाचण्यांचे परिक्षण केले. अंतिम मूल्यमापनासाठी व प्रात्यक्षिकासाठी विद्यार्थ्यांना कांद्यांची लागवड करावी लागली. ही लागवड स्वतः विद्यार्थ्यांनी पुनवळेमध्ये प्रतिशिल शेतकरी नानासाहेब भुजबळ (पुनवळे) यांच्या शेतामध्ये केली व अंतिम प्रात्यक्षिक चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली.

 या वर्षी टीम अॅम्बुषने “कृषीरथ ४.०” हे कांदा काढायचे यंत्र तयार केले होते. कृषीरथ ४.० हे फ्रण्टव्हिल ड्राईव्ह व रिअर व्हिल स्टिअरिंगचे संयोजन होते. या यंत्रामध्ये हार्वेस्टिंग असिस्टन्स सिस्टीम, हायड्रॉलिक मिसलाईंमेंट डिटेक्शन सिस्टीम, एक्झॉस्ट गॅस मॉनिटरिंग सिस्टीम, थरमल मॅनेजमेंट सिस्टीम, ओ-पी साईट असे विविध प्रकारचे ऑटोमेशन केले होते. कृषीरथ ४.० ने प्रात्यक्षिक चाचणीमध्ये ९०% पेक्षा अधिक कांदे बिना नुकसान करता काढले.

टीम अॅम्बुषचा प्रमुख

वेदांत आरोटे, शार्दुल तेग्गी, समीर कुलकर्णी, ओम बडगुजर, तुषार राणे, शताब्दी पिंगळे, श्रेयस चव्हाण, चिराग गायकवाड, विशाल खंडागळे, वेनू सोनवणे, मयुरेश उकळे, प्रफुल्ल जेधे, परमवीर चौधरी, राहुल मिसाळ, अवंती इंगळे, कृष्णकांत सोळंके, अभिषेक थोरवे, भूषण बाविस्कर, चेतन गुडदिंनी, श्रीतेज झिंजूर्डे, अंजली नोटानी या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. फॅकल्टी ऍडवायजर म्हणून प्रा. ईशान साठोने, प्रा. राहुल पितळे व जॉन डिअर ईंडिया प्रा. लि. चे टेक्निकल ऍडवायजर म्हणून केदार भैरट, सौम्या कोव्वुरी व फील्ड एड्वायजर दिपक आरोटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच डॉ. गोविंद कुलकर्णी (डायरेक्टर, पिं. चिं. अभियांत्रिकी महाविद्यालय), डॉ. निलकंठ चोपडे (डेप्युटी डायरेक्टर), डॉ. प्रविण काळे (डीन, स्टुडंट डेव्हलपमेंट व वेल्फेअर), डॉ. शितलकुमार रवंदळे (डीन, इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इन्टरअॅर्क्शन), डॉ. नरेंद्र देवरे (असोसिएट डीन, इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इन्टरअॅर्क्शन), डॉ. पद्माकर देशमुख (मेकॅनिकल विभाग प्रमुख), प्रा. उम्मीद शेख (मॅनेजींग डायरेक्टर, पीसीसीओई मोटरस्पोर्ट काऊंसिल) व प्रा. अशोक गाडेकर (ईन्सट्रकटर, ईन्होवेशन व ईन्क्युबेशन सेंटर) यांचे मार्गदर्शन लाभले. टीममध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचे, पीसीईटीचे अध्यक्ष डी. पी. लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी देखील अभिनंदन केले.