चिंचवड पोटनिवडणुकीत 33 उमेदवारांचे अर्ज मंजूर; 7 उमेदवारांचे अर्ज बाद

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

चिंचवड पोटनिवडणुकीत 33 उमेदवारांचे अर्ज मंजूर; 7 उमेदवारांचे अर्ज बाद

चिंचवड (प्रबोधन न्यूज) – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक होत आहे. थेरगाव येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये मुदतीत ४० उमेदवारांनी ५३ नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. यापैकी ३३ उमेदवारांचे नामनिर्देशन वैध ठरले असून ७ उमेदवारांचे नामनिर्देशन अवैध ठरले आहे. तर ५३ नामनिर्देशन पत्रा पैकी ४० नामनिर्देशन पत्रे वैध ठरली असून १३ नामनिर्देशन पत्रे अवैध ठरली आहेत.

चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक २०२३ च्या अनुषंगाने दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची आज छाननी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी यावेळी वैध आणि अवैध ठरलेल्या नामनिर्देशन पत्रांची घोषणा केली. चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुक २०२३ साठी नियुक्त करण्यात आलेले निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण आणि निवडणुक पोलीस निरीक्षक अनिल किशोर यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या छाननी प्रक्रियेवेळी नामनिर्देशन पत्रे दाखल करणारे उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अर्ज वैध ठरलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे –

1 अॅड. अनिल बाबू सोनावणे

2 मिलिंद कांबळे

3 अजय हनुमंत लोंढे

4 रफिक रशिद कुरेशी

5 अश्विनी लक्ष्मण जगताप

6 मोहन भागवत म्हस्के

7 रवींद्र विनायक पारधे

8 बालाजी लक्ष्मण जगताप

9 गोपाळ यशवंत तंतरपाळे

10 अमोल (देविका) अशोक सूर्यवंशी

11 सिद्धीक इस्माईल शेख

12 किशोर आत्माराम काशीकर

13 डॉ. मिलिंदराजे दिगंबर भोसले

14 सोयलशहा युनुसशहा शेख

15 हरिश भिकोबा मोरे

16 जावेद रशिद शेख

17 राजेंद्र मारुती काटे

18 श्रीधर नारायण साळवे

19 राजू बबन काळे

20 विठ्ठल कृष्णाजी काटे

21 सतिश श्रावण कांबिये

22 राहुल तानाजी कलाटे

23 दादाराव किसान कांबळे

24 मनीषा मनोहर कारंडे

25 चंद्रकांत रंभाजी मोटे

26 सुधीर लक्ष्मण जगताप

27 तुषार दिगंबर लोंढे

28 प्रविण अशोक कदम

29 सतिश नाना सोनावणे

30 प्रफुल्ला शैलेंद्र मोतिलिंग

31 मनोज मधुकर खंडागळे

32 भाऊ रामचंद्र अडागळे

33 सुभाष गोपाळराव बोधे

एकूण उमेदवार – ४०, एकूण नामनिर्देशन पत्रे – ५३, पैकी वैध उमेदवार – ३३, वैध नामनिर्देशन पत्रे – ४०, पैकी अवैध उमेदवार – ०७, अवैध नामनिर्देशन पत्रे – १३, ३३ उमेदवारांपैकी राष्ट्रीयकृत पक्षांच्या उमेदवारांची संख्या - २, नोंदणीकृत पक्षांचे उमेदवार – ५, अपक्ष उमेदवार – २६