राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिलेल्या माथेफिरूंना तात्काळ अटक करा - शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांची मागणी  

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिलेल्या माथेफिरूंना तात्काळ अटक करा - शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांची मागणी   

 

पिंपरी, (प्रबोधन न्यूज ) - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिलेल्या माथेफिरूना तात्काळ अटक करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. या निवेदनात गव्हाणे यांनी म्हटले आहे की, शरद पवार हे केवळ महाराष्ट्राचे नसून देशाचे नेते आहेत. देशातील प्रमुख दिग्गज राजकीय नेत्यांमध्ये शरद पवारांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांच्या जीवितास जर धोका निर्माण झाला तर देश पेटून उठेल. त्यामुळे शासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी. कायदा आणि सुव्यवस्था योग्यप्रकारे हाताळावी. तसेच राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी खबरदारीचे उपाय करावेत. अन्यथा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून सरकारचा तीव्र निषेध करतील, असा इशाराही या निवेदनाद्वारे अजित गव्हाणे यांनी दिला.

यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, शरद उर्फ राजू मिसाळ, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, महिला अध्यक्ष कविताताई आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, गोरक्ष लोखंडे,भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर, चिंचवड विधानसभा अध्यक्ष विनोद नढे, ज्येष्ठ नेत्या शमिमताई पठाण, सामाजिक न्याय अध्यक्ष संजय औसरमल, झोपडपट्टी सेल अध्यक्ष संतोष निसर्गंध, व्यवस्थापन सेल अध्यक्ष अकबर मुल्ला, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, अर्बन सेल महिला अध्यक्ष मनीषा गटकळ, महिला वरिष्ठ कार्याध्यक्ष कविताताई खराडे, चिंचवड विधानसभा संघटक मीरा कदम, भोसरी विधानसभा कार्याध्यक्ष ज्योती गोफणे, ज्येष्ठ नेत्या लता ओवाळ, अर्बन सेल चिंचवड विधानसभा निरीक्षक विजया काटे, सरचिटणीस राजेंद्र हरगुडे, राजन नायर, चिटणीस राजू चांदणे,  महिला भोसरी विधानसभा अध्यक्ष सारिका हरगुडे, साफसफाई कामगार महिला अध्यक्ष सुवर्णा निकम, महिला उपाध्यक्ष मेघा पळशीकर, सपना कदम, रंजना रणदिवे इत्यादी कार्यकर्त्यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.