एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळणार ?
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई,
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप दिवसेंदिवस अधिकच चिघळला जाऊ लागला आहे. रविवारी राज्यातील १२९ आगारांतील कामगारांनी बंद पाळला होता. सोमवार मध्यरात्रीपासून आणखी पन्नासहून अधिक आगारातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे तब्बल 180 च्या आसपास आगारातील काम ठप्प झाल्याने संप आणखी चिघळण्याची शक्यता वाढली आहे.
या संपामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहेत. एसटी कामगारांच्या संपाला पाठिंबा देण्याविषयी आज (सोमवार दि. ८ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजता मुंबईत कृती समितीची बैठक होणार आहे. समितीत नसलेल्या संघर्ष एसटी कामगार युनियनने कामगारांच्या मागण्यांना पाठिंबा देऊन सर्व आगारांमध्ये एसटी बंदची हाक दिली आहे. दरम्यान, संपाला १७ कामगार संघटनांच्या कृती समितीचाही पाठिंबा मिळण्याची शक्यता असून, संघर्ष कामगार युनियननेही 'संपूर्ण बंद'ची हाक दिली आहे. दरम्यान, आजपासून राज्यभर एसटी सेवा ठप्प होण्याची भीती आहे.
दरम्यान, उच्च न्यायालयाने संप न करण्याचे आदेश देऊनही कर्मचारी संघटनांनी त्याकडे दुर्लक्ष करून पहिल्या दोन सुनावण्यांकडे पाठ फिरवली होती. अखेर न्यायालयाने या प्रकरणी सरकारला प्रतिवादी केले. सरकारनेही कर्मचारी संघटनांच्या मागण्यांबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली अर्थ व परिवहन विभागाच्या प्रधान सचिवांची विशेष समिती स्थापन करण्याचे आणि त्याचा अहवाल न्यायालयात सादर करण्याची तयारी दर्शवली. राज्य शासनाप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांनाही २८ टक्के महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता देण्याची मागणी करत एसटीतील छोटय़ा-मोठय़ा १७ कामगार संघटनाच्या कृती समितीने २७ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण सुरू केले. त्यापाठोपाठ २८ ऑक्टोबरला कामगारांनी उत्स्फूर्त संपही सुरू केला. त्यामुळे राज्यातील ७० टक्क्य़ांहून अधिक एसटी सेवा कोलमडली आहे.