मी इथून निवडणूक जिंकलो आहे, त्यामुळेच मला काटेंच्या विजयाची खात्री

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

मी इथून निवडणूक जिंकलो आहे, त्यामुळेच मला काटेंच्या विजयाची खात्री

चिंचवड (प्रबोधन न्यूज) - आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपने मोठे प्रयत्न केले. मात्र, महाविकास आघाडीने ही निवडणूक लढण्याची भूमिका घेतली असून, अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीकडून नाना काटे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

दरम्यान, शिवसेनेचे स्थानिक बंडखोर प्रभावी नेते राहुल कलाटे यांनीही ही निवडणूक अपक्ष लढण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसमोर बंडखोरीचे आव्हान उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

अजित पवार म्हणाले, दोन जागा होत्या त्यापैकी कसबा मतदारसंघाची जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली. तर आज आम्ही सर्वांनी नाना काटे यांचा अर्ज दाखल केलेला आहे. उद्या अर्ज छाणणी आहे, त्यानंतर अर्ज मागे घेतला जाऊ शकतो. काल रात्री उशीरापर्यंत आम्ही या ठिकाणी उमेदवारीसंदर्भात तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत होतो. परंतु दुर्दैवाने यावर एकमत झाले नव्हते.

मग आज सकाळी मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो. माझी बाळासाहेब थोरातांशीही चर्चा झाली. त्यांना आम्ही नाना काटे अर्ज दाखल करत असल्याची माहिती दिली. आमच्याकडे ज्यांनी उमेदवारी मागितली होती, त्यांना शांत ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न असतो. राहुल कलाटेंना भेटायलाही काहीजण गेले होते. परंतु त्यांच्यात काय चर्चा झाली याची माहिती अद्यापपर्यंत माझ्याकडे आलेली नाही.

यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा विजय कसा शक्य आहे, राहुल काटे यांना किती मतं पडू शकतात हे सांगत असतांना चिंचवडचा इतिहासच अजित पवार यांनी सांगितला आहे. अजित पवार यांनी राहुल कलाटे यांची माघार घेण्यासाठी प्रयत्न करू असे सांगत राहुल कलाटे यांना मागील वेळेला मिळालेली मत आत्ताही पडतील असे नाही.

माझी पाटी कोरी होती तेव्हापासून माझं आणि पिंपरी चिंचवडचं नातं आहे. छोटी-छोटी गावं असल्यापासून ते शहराचा विकास होईपर्यन्त मी काम केलं आहे, आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणूनही पिंपरी चिंचवडची ओळख राहिली आहे. सर्वाधिक मताधिक्य मला या मतदार संघातून मिळाले होते, त्यामुळे कष्ट केले तर निवडणूक जिंकू शकतो, जुना काँग्रेसचा हा मतदार संघ आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे हा मतदार संघ आहे.

लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना सहानुभूती आहे असं पत्रकांरांनी म्हणताच, हे तुम्हीच म्हणताय म्हणत अजित पवार यांनी चिंचवडमध्ये नाना काटे यांचा विजय निश्चित असल्याचे म्हंटले आहे. याशिवाय काटे हे महाविकास आघाडीचेच उमेदवार असल्याचे अजित पवार म्हणाले. निवडणूक लाईटली घेतली तर निवडणूक सोपी नाही, पण जर कष्ट घेतले तर निवडणूक अवघड पण नाही, 1991 पासून मी इथून राजकीय सुरुवात केली आहे. देशात पहिल्या क्रमांकाची मतेही मला मिळाली होती.