सकाळी 7 पासून अजित पवारांचे उद्घाटन, भूमीपूजनाचे कार्यक्रम सुरू

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

सकाळी 7 पासून अजित पवारांचे उद्घाटन, भूमीपूजनाचे कार्यक्रम सुरू
सकाळी 7 पासून अजित पवारांचे उद्घाटन, भूमीपूजनाचे कार्यक्रम सुरू
सकाळी 7 पासून अजित पवारांचे उद्घाटन, भूमीपूजनाचे कार्यक्रम सुरू

पिंपरी-चिंचवड, दि. 3 जून - पिंपरी-चिंचवड महापालिका व आर्मी रोईंग नोड, सी.एम.ई, कासारवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिका परिसरातील विद्यार्थ्यासाठी सुरू करण्यात आलेल्या रोईंग प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले.

अजित पवार यांनी प्रशिक्षण केंद्राची पाहणी करून माहिती घेतली. केंद्राचे समन्वयक कर्नल संदीप चहल यांनी केंद्र व केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण याबाबत माहिती दिली. केंद्रामार्फत वय वर्षे 13 ते 17 या वयोगटातील विद्यार्थ्यांना रोईंग प्रशिक्षण दिले जाणार आहे. एकूण 15 विद्यार्थी खेळाडूंची रोईंग खेळाच्या प्रशिक्षणाकरिता निवड करण्यात आली असून या खेळाडूंना रोईंग प्रशिक्षण आर्मी रोईंग बोड, सी.एम.ई. कासारवाडी यांच्या मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार तसेच या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होण्यास मदत होणार होणार असल्याचे चहल यांनी सांगितले. क्रीडा विभागाच्या सुषमा शिंदे यांनीही क्रीडा विभगाच्यावतीने येथे सुरू असलेल्या उपक्रमाबाबत माहिती दिली. यावेळी रोईंग प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कीट वाटप करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मान्यतेने व महाराष्ट्र हॉकी औंध, पुणे यांच्या वतीने नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडियम येथे सुरू करण्यात आलेल्या पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय हॉकी प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन उपुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पवार यांनी उपस्थित खेळाडूंशी संवाद साधून प्रशिक्षणाबाबत माहिती घेतली.

भविष्यात होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धाच्या अनुषंगाने व शहरास देशाची क्रीडा राजधानी म्हणून ओळख निर्माण व्हावी व पिंपरी चिंचवड शहरामध्ये हॉकी खेळाचा प्रचार, प्रसार आणि विकास करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या व हॉकी महाराष्ट्र औंध पुणे यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय हॉकी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. शहरातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नवे खेळाडू निर्माण करण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे.

पवार यांच्या हस्ते स्मार्ट मोटार आणि फायर मोटार सायकल्सचे वाटप

महापालिका आवारात अजित पवारांच्या हस्ते पोलिसांना गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पोलीस पेट्रोलिंगसाठी ५० स्मार्ट मोटार सायकल्स हस्तांतरीत करण्यात आल्या. अग्निशमन विभागाला गल्लीबोळांच्या ठिकाणी तातडीने सहजपणे पोहोचून अधिक प्रभावी अग्निशमन सेवा देण्यासाठी फायटर मोटार सायकल्सचे वाटपही त्यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी महापालिका आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे आणि राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.