चिंचवड पोटनिवडणूक : मविआचे उमेदवार नाना काटे यांनी अर्ज दाखल केला

चिंचवड (प्रबोधन न्यूज) - चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांनी आज (मंगळवारी) उमेदवारी अर्ज अजित पवार यांच्या उपस्थितीत दाखल केला. पिंपळेसौदागर येथून रॅली काढत थेरगाव येथील ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला.

पिंपरी चिंचववड येथील मतदार संघात भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने नाना काटे यांना उमेदवारी दिली.

महाविकास आघाडी कडून आयात उमेदवार राहुल कलाटे यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. दरम्यान, काल विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पिंपरी मतदार संघात येत सर्व इच्छुकांची बैठक घेतली होती. यावेळी उमेदवार हा पक्षातील असावा असा आग्रह धरण्यात आला होता. त्यानुसार राहुल कलाटे यांचे नाव बाद करत पक्षातील नाना काटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

नाना काटे हे राष्ट्रवादीचे नगरसेवक राहिले असून ते आमदारकी साठी इच्छुक होते. त्यांना उमेदवारी मिळाल्याने ते या संधीचे सोने करणार का या कडे आता लक्ष लागून आहे.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ आयोजित रॅलीमध्ये विरोधी पक्ष नेते अजित पवार सहभागी झाले होते.

महाविकास आघाडीमधील सर्व घटक पक्ष चिंचवड विधानसभेची जागा निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करतील असा विश्वास अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.