मातोश्रीसमोर हनुमान चालिसा वाचण्याचा हट्ट राणा दाम्पत्यांनी सोडला

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

मातोश्रीसमोर हनुमान चालिसा वाचण्याचा हट्ट राणा दाम्पत्यांनी सोडला

अजित पवार CM असते तर ही परिस्थिती आली नसती – नवनीत राणा

मुंबई, दि. २३ एप्रिल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' या निवासस्थानाच्या  बाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्याची घोषणा करणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आपली भूमिका बदलली आहे. राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने मुंबईत काही ठिकाणी तणावाची स्थितीही निर्माण झाली होती. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आवाहन केल्यानंतरही राणा दाम्पत्य आपल्या भूमिकेवर ठाम होते. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यामुळे नवनीत राणा आणि रवी राणा यांनी 'मातोश्री' परिसरात जाण्याचं टाळलं आहे. याबाबत रवी राणा यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

लता मंगेशकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान मुंबईत येणार आहेत. याच अनुषंगाने राणा दाम्पत्याने आपले आंदोलन माघार घेतले आहे. पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, आम्ही चुकीचे वक्तव्य केले नाही. हनुमान चालिसेसाठी आमचा आग्रह होता, मात्र पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे आम्ही आंदोलन मागे घेत आहोत. आम्ही भक्तिभावाने मातोश्रीवर जाणार होतो. मात्र त्यांनी येऊ दिले नाही. शिवसेनेचे जेवढे आमदार निवडून दिले ते केवळ मोदींच्या भरवशावर आले आहेत. निवडणुकांच्या काळात बाळासाहेबांचा फोटो छोटा होता आणि पंतप्रधानाचा फोटो मोठा होता. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने शिवसैनिकांनी माझ्याघरावर हल्ला केला. त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही राणा यांनी केली आहे.

त्या पुढे म्हणाल्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घाबरले आहेत आणि त्यामुळे त्यांनी पोलिसांचा आडोसा घेतला आहे. आम्ही समजूतदारपणा दाखवून आंदोलन मागे घेतले. मुख्यमंत्र्यांनी गुंड पाढवून आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा शिवसैनिकांना आणि गुडांना आम्ही घाबरत नाही. घाबरलो असतो तर मुंबईत आलो नसतो. असे खासदार नवनीत राणांनी म्हटले आहे.

नवनीत राणा म्हणाल्या की, मुख्यमंत्री कायदा आणि सुव्यवस्था बिघडवत आहे. अजित पवार जर मुख्यमंत्री असते तर ही परिस्थिती आली नसती. आमच्या अमरावतीच्या घरावर हल्ला करण्यात आला. मुख्यमंत्र्यांना काहीच काम उरले नाही का, असा सवालही त्यांनी केला. गुंडाना उत्तर देण्यासाठी मी इथे आलेले नाही, तर जनसेवेसाठी आले आहे, असेही नवनीत राणांनी म्हटले.

महाराष्ट्रात येऊन मातोश्रीला आव्हान देण्याची कुणाची हिंमत नाही हे स्पष्ट झाले. पंतप्रधानाचा दौरा व्यवस्थित होणार. मात्र हे केवळ कारण आहे, असे वरुण सरदेसाई यांनी म्हटले आहे. अमरावतीवरून मातोश्रीवर येणार होते. मात्र त्यांना येता आले नाही. शिवसेनेचा नाद करू नये, हे राणा दाम्पत्याला समजले, अशी टीका सरदेसाई यांनी केली आहे.