शहरातील शहराध्यक्षांसह माजी नगरसेवक, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांचा अजित पवारांना पाठींबा
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. काका शरद पवार विरुद्ध पुतणे अजित पवार असा संघर्ष सुरू झाला आहे. दोन्ही बाजूने सर्व पदाधिकाऱ्यांची आज बैठक बोलावली आहे. या बैठकीला कोण कोण उपस्थित राहते, गैरहजर राहते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान आज मुंबईत अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही या गटांची स्वतंत्र बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत उपस्थित राहण्याकरिता पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसने अजितदादा पवार यांना पाठिंबा दिला आहे.
शहरातील शहराध्यक्षांसह माजी नगरसेवक, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते आज बुधवारी (दि. ५) सकाळी मुंबईकडे रवाना झाले आहेत.
पिंपरी चिंचवडमधून अजितदादा पवार यांच्या बैठकीला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, राजू मिसाळ, भाऊसाहेब भोईर, श्याम लांडे, राहुल भोसले, माजी नगरसेवक संजय वाबळे, मोरेश्वर भोंडवे, समीर मासुळकर, राष्ट्रवादी युवकचे विशाल वाकडकर, यश साने, प्रदिप तापकीर, श्याम जगताप, फजल शेख, इखलास सय्यद, सुशील मंचरकर, अक्षय माछरे, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईला रवाना झाले आहेत.
बैठक कुठे आणि किती वाजता…
अजित पवार – स्थळ – एम. ई. टी. भुजबळ नॉलेज सिटी, लीलावती हॉस्पिटल समोर, बांद्रा पश्चिम, मुंबई – सकाळी ११ वाजता.