नागपूरच्या जागेच्या पराभवाचे दुःख – फडणवीस

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

नागपूरच्या जागेच्या पराभवाचे दुःख – फडणवीस

मुंबई (प्रबोधन न्यूज) - नागपूरच्या जागेवर भाजपला धक्का देत काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. पाच जागांपैकी ३ जागा मविआच्या पदरात पडल्या आहेत. या निकालाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, नागपूरची जागा आम्ही कायम राखू शकलो नाही, नागपूरची जागा शिक्षक परिषदेने लढली. मुळात कोकण आणि नागपूर दोन्ही जागा शिक्षक परिषद लढायची. या दोन्ही जागा भाजपला लढू द्याव्यात, अशाप्रकारचा आमचा आग्रह होता पण, कोकणात त्यांनी तो आग्रह मान्य केला पण नागपूरची जागा आम्हाला लढू द्या, असा त्यांनी आग्रह केला. आम्ही त्यावेळी शिक्षक परिषदेला हे सांगितले होते की, शिक्षक परिषद नागपूरची जागा कदाचित निवडून येऊ शकणार नाही, भाजप लढली तर निवडून येऊ शकेल. पण त्यांचा आग्रह असल्याने त्यांनी जागा लढवली आणि आम्ही त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. पण त्या ठिकाणी ती जागा निवडून येऊ शकली नाही. याचे निश्चित आम्हाला दु:ख आहे, असे फडणवीस नागपूरच्या जागेबाबत म्हणाले.

अमरावतीच्या जागेबाबत ते म्हणाले की, अमरावतीमध्ये आम्हाला अपेक्षित मते मिळालेली नाही. थोडी मते आम्हाला कमी पडली आहेत, त्यामुळे निश्चित याचा विचार हा पक्ष करेल. विशेषता तिथे बाद ठरलेल्या मतांची जी संख्या आहे, ती फार मोठी आहे आणि विशेषकरून त्यामध्ये आमच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांमध्ये बाद मतं जास्त आहेत. याचाही एक विचार आम्हाला करावा लागेल, अशी माहिती फडणवीसांनी यावेळी दिली.

फडणवीस पुढे म्हणाले की, सत्यजित तांबे यांचे अभिनंदन करेन. कारण महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षांनी त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु अपक्ष म्हणून निवडणूक लढवूनही मोठ्या मताधिक्क्याने ते विजयी झाले. म्हणून त्यांनाही माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो, असे म्हणत महाविकास आघाडीला फडणवीसांनी चिमटाही काढला.

याचबरोबर एकूणच या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये काही गोष्टी आमच्या अपेक्षेप्रमाणे झाल्या, तर काही गोष्टी आमच्या अपेक्षेच्या बाहेर झाल्या. त्यामुळे ज्या झाल्या आहेत त्याबाबत आनंद आहे आणि ज्या झाल्या नाहीत, त्या संदर्भात निश्चितच आम्ही चिंतन करू. त्या संदर्भात काय सुधारणा करण्याची आवश्यकता आहे ते बघू, असे शेवटी फडणवीस म्हणाले.