आषाढी वारीसाठी राज्यभरातून धावणार पाच हजार बस
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई , (प्रबोधन न्यूज ) - आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी लाखो भाविक आपल्या लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून ऐतिहासिक वारीवर बंदी घालण्यात आली होती. मात्र आता कोरोनाचे सावट दूर झाल्याने यंदा वारीत वारकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. याचपार्श्वभूमीवर आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर यात्राकारिता वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने राज्यभरातून 5 हजार विशेष गाड्या सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. 25 जून ते 5 जुलै दरम्यान विशेष गाड्या चालवण्यात येणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी 200 जादा बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
पंढरपूर आषाढी यात्रा हा महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेचा जिव्हाळ्याचा विषय आहे. यामध्ये एसटीच्या प्रवासी वाहतुकीला अनन्य साधारण महत्त्व आहे. याकाळात एसटीकडून आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा प्रवाशांनी वारकऱ्यांना दिल्या जाव्यात. भाविक-प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूर घेऊन जाणे तसेच विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सुखरुपपणे घरी आणून सोडण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी एसटीवर असणार आहे.