राणा दाम्पत्यांचा खोटारडेपणा पोलीस उघडकीस आणणार

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

राणा दाम्पत्यांचा खोटारडेपणा पोलीस उघडकीस आणणार

आणखी एक व्हिडिओ पोलीस प्रसारित करणार

राणा दाम्पत्यांच्या अडचणीत वाढ होणार

मुंबई, दि. २७ एप्रिल – आपल्याला पोलीस कोठडीत जातीयभेदाची वागणूक मिळाल्याचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी त्यांचा हा खोटारपणा सिद्ध केला आहे. पाणी सुद्धा न पिऊ दिल्याचा आरोप नवनीत राणांनी केल्यानंतर पोलिसांनी पोलीस स्टेशनमधील एक व्हिडिओ सादर केला त्यात नवनीत राणा चहा पिताना दिसून आले आहे. त्यामुळे राणा तोंडावर आपटल्या असून, पोलिसांनी त्यांचा आणखी एक व्हिडिओ प्रसारित करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे राणा दाम्पत्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी राणा दाम्पत्याचा खार पोलीस ठाण्यातील  व्हिडिओ टविट केल्यानंतर राणा यांचे वकील रिझवान मर्चट यांनी एक दावा केला आहे. राणांना खार पोलीस स्टेशनमध्ये नाही तर सांताक्रूझ पोलीस ठाण्यात हीन वागणूक दिल्याची तक्रार केल्याचा मर्चट यांचा दावा आहे.

खार पोलिसांनंतर आता सांताक्रूझ पोलीस हे खासदार नवनीत राणा यांच्यासंबंधीचे सीसीटीव्ही फुटेज जारी करणार असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे. सांताक्रूझ पोलीस ठाण्यातील लॉकअपमधील हा व्हिडिओ असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. राणा यांच्याशी योग्य पद्धतीने व्यवहार केला, त्यांना ऑफिसर्ससाठी असलेल्या टॉयलेटचा वापर करु दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या सर्व गोष्टी पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाल्या आहेत. त्यामुळे राणा आणि त्यांचे वकिल रिझवान मर्चेट हे खोटा दावा करत आहेत की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.