…आणि विद्यार्थ्यांच्या मदतीला धावला सांताक्लॉज

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

…आणि विद्यार्थ्यांच्या मदतीला धावला सांताक्लॉज

पिंपरी (प्रबोधन न्यूज) – रविवार दि. 5 फेब्रुवारीला चिंचवड येथील सायन्स पार्कला गुहागर तालुक्यातील अती दुर्गम भागातील विद्यार्थी भेट देण्यासाठी आले होते. सुमारे 40 विद्यार्थ्यांना घेऊन बस आली होती. विद्यार्थ्यांनी थ्री डी शोचे नाममात्र (सवलतीच्या) दराचे तिकीट घेतले परंतु तारामंडल शोसाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे तारामंडल न पाहण्याचा निर्णय या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या शिक्षकांनी घेतला.

ही बाब सायन्स पार्क पाहण्यासाठी आपल्या कुटुंबासमवेत आलेल्या एका प्रेक्षकाला समजली. त्यांनी त्वरित आपल्या पाकिटातून 1 हजार 320 रुपये काढून या विद्यार्थ्यांचे तारामंडल शोचे तिकीट खरेदी केले त्यामुळे विद्यार्थी हरखले व त्यांना हा शो पाहता आला. कोणतीही ओळख नसताना या विद्यार्थ्यांचे तिकीट काढणाऱ्या गृहस्थाचे नाव आहे अमोल मोरे (रा. पिंपळे सौदागर).

ही बाब सायन्स कर्मचाऱ्यांना समजताच त्यांनी आपल्या वरिष्ठांच्या कानावर ही गोष्ट घातली. सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन अमोल मोरे यांचा सत्कार केला. त्या वेळी अमोल मोरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले की, अशा विद्यार्थ्यांसाठी सामाजिक जाणिवेतून पुढे येऊन मदत केली पाहिजे. तसेच सायन्स पार्कच्या सर्व सुविधांचा लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना झाला पाहिजे. सायन्स पार्क विज्ञान प्रसारासाठी चांगले काम करीत असल्याचे ते म्हणाले.

अश्या विद्यार्थ्या साठी सामाजिक जाणिवेतून पुढे येऊन मदत केली पाहिजे तसेच सायन्स पार्क च्या सर्व सुविधांचा लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना झाला पाहिजे असे मत व्यक्त केले. त्यांनी सायन्स पार्क विज्ञान प्रसारासाठी चांगले काम करीत असल्याचे सांगीतले. या वेळी अमोल मोरे यांचे मन:पूर्वक आभार व सदिच्छा व्यक्त केल्या.