अखेर छ.शिवाजी महाराजांच्या शिल्पामागील एल.ई.डी लाईटसची दुरुस्ती; दिपक खैरनार यांनी केली होती मनपा आयुक्तांकडे तक्रार 

अखेर छ.शिवाजी महाराजांच्या शिल्पामागील एल.ई.डी लाईटसची दुरुस्ती; दिपक खैरनार यांनी केली होती मनपा आयुक्तांकडे तक्रार 

पिंपरी, (प्रबोधन न्यूज )  -  निगडीतील ‘भक्ती-शक्ती' उड्डाणपुलाखालील जगद्गुरू संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज शिल्पामागील बंद अवस्थेत असणार्या एल.ई.डी लाईटसची महापालिका प्रशासनाच्या वतीने दुरुस्ती करण्यात आली. यासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली होती.

             याबाबत सविस्तर वृत्त असे की, निगडीतील ‘जगद्गगुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज’ (भक्ती-शक्ती) या उड्डाणपुला खालून जाणाऱ्या मार्गावरील जगद्गुरू संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांच्या (प्रोफाईल कटिंग) शिल्पाच्या मागे असणार्या एल.ई.डी लाईट ह्या अनेक दिवसांपासून बंद होत्या. त्यामुळे त्या शिल्पाच्या शोभेस बाधा येत असल्यामुळे सदरील एल.ई.डी लाईटसची दुरुस्ती करण्यात यावी,अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती. अखेर शिल्पामागील एल.ई.डी लाईटची दुरुस्ती करण्यात आल्याने दिपक खैरनार यांनी समाधान व्यक्त करत आयुक्तांचे आभार मानले आहेत.