चंद्रशेखर जाधव यांनी रोजा इफ्तार पार्टीत घडविले राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

चंद्रशेखर जाधव यांनी रोजा इफ्तार पार्टीत घडविले राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन

पिंपरी-चिंचवड, दि. 21 एप्रिल - भारताच्या संविधानात उल्लेख केल्याप्रमाणे राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करीत पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांनी थेरगाव येथील दारुल उलम झकारिया मदरसा येथे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते.

यावेळी हिंदू, मुस्लिम, ख्रिचन, बौध्द धर्मीय युवक उपस्थित होते. यामधे पिंपरी चिंचवड काँग्रेस युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले, उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अनिकेत नवले, तसेच मदरश्याचे अध्यक्ष हाफिज निजामुद्दीन खान, विश्वस्त इशाक शेख, मौलाना अब्दुल वाहिद, हाफीज साहब अरिफ खान, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस वासिम शेख, विनिता तिवारी, जिफिन जॉन्सन, भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतिक जगताप, चिंचवड विधानसभा अध्यक्ष रोहित शेळके, उपाध्यक्ष संदेश बोर्डे, कुंदन कसबे , गौरव चौधरी, मयूर रोकडे, पर्यावरण शहर अध्यक्ष अक्षय शहरकर, ओंकार चिमेगावे यांचा समावेश होता.

यावेळी नमाज पठण झाल्यानंतर सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी चंद्रशेखर जाधव म्हणाले की, भारतातील सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा आणि त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा जपण्याचा संकल्प करीत भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा संकल्प सर्व युवकांनी केला आहे.

देशात सर्व धर्मीयांमध्ये विश्वासाचे आणि सलोख्याचे वातावरण निर्माण करीत राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे काम शहर युवक काँग्रेसचे कार्यकर्ते करीत आहेत असे काँग्रेसचे शहर युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले म्हणाले.

उपस्थितांचे स्वागत वसीम शेख, आभार प्रतीक जगताप यांनी मानले.