उद्योगनगरीत नाताळला चर्चमध्ये आसनक्षमतेच्या 50 टक्के लोकांना परवानगी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

उद्योगनगरीत नाताळला चर्चमध्ये आसनक्षमतेच्या 50 टक्के लोकांना परवानगी
पिंपरी -
ख्रिस्ती बांधवांचा सण नाताळनिमित्त आयुक्त राजेश पाटील यांनी नियमावली जाहीर केली आहे. नाताळ / ख्रिसमस निमित्त चर्चमध्ये उपलब्ध आसनक्षमतेच्या 50 टक्के पर्यंत लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी असेल. नागरिकांनी सुरक्षित अंतराचे पालन करावे. धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे अथवा मिरवणूकांचे आयोजन करण्यात येऊ नये, असे आदेश त्यांनी काढले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात ओमिक्रोन बाधितांची संख्या वाढत चाललीअसून गुरुवारी शहरात एकाचदिवशी नवीन सात रुग्ण आढळले आहेत. आता शहरातील रुग्णसंख्या 19 वर पोहोचली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. नाताळ सणानिमित्त ख्रिश्चन बांधवांनी आरोग्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात एकत्र न येता या वर्षी देखील नाताळचा सण पूर्णत: खबरदारी घेऊन साध्या पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन आयुक्त पाटील यांनी केले आहे. 

आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केलेल्या सूचना याप्रमाणे :
. नाताळ / ख्रिसमस निमित्ताने चर्चमध्ये उपलब्ध आसनक्षमतेच्या 50 टक्के पर्यंत लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी असेल. 
. चर्चमध्ये कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सामाजिक अंतर राखले जाईल. 
. मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच चर्चमध्ये निर्जंतूकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. 
. नाताळच्या दिवशी चर्चमध्ये प्रभू येशूच्या जीवनावरील देखावे. ख्रिसमस ट्री अगर काही वस्तू ठेवल्या जातात. त्या ठिकाणी सामाजिक अंतर व स्वच्छतेचे नियम पाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात. 
. चर्चमध्ये प्रभु येशू ख्रिस्त यांचे स्तुतीगीत (Choir) गाण्यासाठी कमीत कमी गायकांचा (Choiristers) समावेश करण्यात यावा. त्यावेळी वेगवेगळ्या माईकचा वापर करून सामाजिक अंतराचे पालन करण्यात यावे.
. चर्चच्या बाहेर/ परिसरात दुकाने अगर स्टॉल लावू नयेत. 
. सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर मोठ्या संख्येने एकत्र येणे अथवा गर्दी करणे टाळावे. कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होईल अशा धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे अथवा मिरवणूकांचे आयोजन करण्यात येऊ नये. 
. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये, ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे काटकोर पालन करण्यात यावे.