शरद पवार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे पिंपरी-चिंचवड शहरात तीन ठिकाणी थेट प्रक्षेपण 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

शरद पवार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे पिंपरी-चिंचवड शहरात तीन ठिकाणी थेट प्रक्षेपण 
पिंपरी - 
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या  (दि. 12) मुंबई येथे अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे . हा सोहळा पाहण्याची सुविधा शहरात तीन ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे . सदर सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी केले आहे. 
शरद पवार यांचा उद्या रविवारी विविध कार्यक्रमांनी व उत्साही वातावरणात वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुंबई येथे अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे . तसेच वाढदिवसानिमित्त व्हर्च्युअल रॅलीही काढण्यात येणार आहे . रविवारी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत हा सोहळा थेट पाहण्याची सुविधा पिंपरी - चिंचवडकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. 
पिंपरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी आचार्य अत्रे नाट्यगृह , संत तुकाराम नगर , पिंपरी येथे तर चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी विमल गार्डन , रहाटणी येथे तसेच भोसरी मतदारसंघातील नागरिकांसाठी अंकुशराव लांडगे सभागृह , भोसरी येथे ही प्रक्षेपण पाहता येणार आहे . या सोहळ्यामध्ये शहरातील नागरिकांनी सहभागी व्हावे , असे आवाहनही योगेश बहल यांनी केले आहे .