अहंकारी मनुष्य 'आपण मोठे आहोत' अशी भावना डोक्यात धरून गुरगुरत राहतो – आमदार रोहित पवार
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई, (प्रबोधन न्यूज) – देहूतल्या संत तुकाराम मंदिराच्या शिळेच्या लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाषण झालं नाही. यावरून वादाला तोंड फुटलं आहे. आमदार रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक वॉलवरून भाजपला खडे बोल सुनावले आहेत. यात ते म्हणतात की, छत्रपतींचा तसेच क्रांतीज्योतींचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना पंतप्रधान साहेबांसमोर खडे बोल सुनावणाऱ्या अजितदादांच्या स्पष्टवक्तेपणामुळे भाजपची नक्कीच अडचण होत असणार म्हणून कदाचित भाजपने आजच्या कार्यक्रमात अजितदादांना बोलू दिले नाही.
वारकऱ्यांच्या कार्यक्रमात सर्व भेद, द्वेष, अहंकार विसरून सहभागी व्हायचे असते. परंतु अहंकाराच्या आहारी गेलेल्या प्रदेश भाजपच्या नेत्यांकडून ही अपेक्षा करणे व्यर्थ आहे. अहंकाराबद्दल संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात अहंकार हा आत्मनाश घडवितो, माणसाला सत्यापर्यंत पोचू देत नाही. अहंकारी मनुष्य 'आपण मोठे आहोत' अशी भावना डोक्यात धरून गुरगुरत राहतो आणि असंच काहीसं आज प्रदेश भाजप नेत्यांचं झालं असावं.
असो संत तुकोबारायांच्या दर्शनाने नक्कीच सर्वांना सद्बुद्धी प्राप्त होईल, अशी अपेक्षा!
दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री असल्याने त्यांना बोलू द्यावं अशी विनंती पंतप्रधान कार्यालयाकडे करण्यात आली होती. पण पीएमओने त्याला काही उत्तर दिलं नाही. हे अतिशय वेदनादायी आणि अपमानकारक आहे. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना न बोलू देणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. हे जे झालं ते अयोग्य आहे."
प्रोटोकॉलप्रमाणे अजित पवारांना पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणं बंधनकारक आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. पण त्यांना बोलू दिलं नाही.
या कार्यक्रमाला राजशिष्टाचाराचा भाग म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. पंतप्रधानांच्या स्वागतापासून या कार्यक्रमाच्या समारोपापर्यंत अजित पवार उपस्थित होते. राजशिष्टाचाराचा भाग म्हणून अजित पवार पंतप्रधानांच्या स्वागताला विमानतळावर उपस्थित होते. त्यानंतर ते कार्यक्रमालाही होते. देहू संस्थान कुठल्याही पक्षाचं नाही. अजित पवारांना जाणीवपूर्वक डावललं असेल तर तो महाराष्ट्राचा अपमान आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.
"देहू येथील संत तुकाराम महाराज शिळा मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेण्यासाठी आणि त्यांचे राज्याच्या वतीने स्वागत करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. अजितदादा पवार हे पुणे विमानतळावर हजर होते. राज्याच्या वतीने पंतप्रधानांचे त्यांनी स्वागत केले आणि देहू येथील कार्यक्रमात उपस्थित राहिले. हा राज्याचा राजशिष्टाचार मा.ना.अजितदादा पवार यांनी पाळला असून पंतप्रधान कार्यालयाने त्यांचा राजशिष्टाचार का पाळला नाही?" असं वरपे सांगतात.
"राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांच्या पंतप्रधान कार्यालयाने नकार देणे हे कोणत्या पंतप्रधान कार्यालयाचा कोणत्या राजशिष्टाचारात बसते? मा. ना. अजितदादांच्या भाषणाला नकार देणे हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. महाराष्ट्राच्या अपमानाची परंपरा नरेंद्र मोदी कायम ठेवू पाहत आहेत काय?
"पंतप्रधान कार्यालयाच्या प्रोटोकॉलमध्ये बसत नसताना मा. देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले असून, पंतप्रधान कार्यालयाच्या प्रोटोकॉलमध्ये बसत असताना मा. ना. अजितदादा पवार यांच्या देहू येथील भाषणाला पंतप्रधान कार्यालयाचा नकार, हे राजकारण राज्यातील भाजपच्या सांगण्यावरून झाले असा माझा स्पष्ट आरोप आहे. याबाबत पंतप्रधान कार्यालयाने आपली भूमिका जाहीर करावी," असं वरपे सांगतात.
देहूतल्या शिळा मंदिर लोकार्पण सोहळा पंतप्रधानांच्या हस्ते झाला. कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलण्याची संधी मिळाली नाही. यावरुन पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला शहराध्यक्ष कविता अल्हाट यांनी केंद्र सरकारवर टीका केली ते म्हणाल्या की, मोदी सरकारने केवळ अजितदादांचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या देखील अपमान केला.
देहूतल्या संत तुकाराम मंदिराच्या शिळेच्या लोकार्पण सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. भारतीय जनता पार्टीने आपल्या पक्षाचे नाव अवमान पार्टी ठेवावे, २०१४ मध्ये देखील पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना मुंबई येथे एका कार्यक्रमांमध्ये त्याच्या देखील अवमान केला होता, यामुळे भारतीय जनता पार्टीने आपल्या पक्षाचे नाव अवमान पार्टी ठेवावे, अशी टीका पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला शहराध्यक्ष कविता अल्हाट यांनी केली.