सुनेत्रा पवार यांच्याकडून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई , (प्रबोधन न्यूज ) - राज्यसभेचे १० खासदार लोकसभेवर निवडून गेल्यामुळे त्यांच्या रिक्त जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे.
राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त जागेवर सुनेत्रा पवार यांना संधी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आज मुंबईतील विधानभवनात राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आदी मान्यवर उपस्थित होते.