माथाडी कामगारांचा आज राज्यव्यापी संप; भाजीपाला महागणार
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई (प्रबोधन न्यूज) - विविध मागण्यांसाठी आज माथाडी कामगारांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे. यामुळे आज सकाळ पासूनच बाजारातील व्यवहार हे थंडावले आहेत. मुंबईतील पाचही मार्केट बंद असल्याने याचा परिणाम भाजीपल्याच्या पुरवठ्यावर होणार आहे. त्यामुळे भाजीपाला महागण्याची शक्यता आहे. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली माथाडी कामगारांचे काम बंद आंदोलन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे नरेंद्र पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खंदे समर्थक आहेत. त्यांच्या या सरकारविरोधी आंदोलनामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
पाटील यांनी दिलेल्या महितीनुसार माथाडी कामगारांच्या शासनाच्या विविध विभागाअंतर्गत असलेल्या न्याय प्रश्नांची सोडवण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. माथाडी कामगारांचे प्रश्न न सोडवल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असे पाटील म्हणाले. माथाडी कामगारांच्या प्रश्नांसाठी या पूर्वी अनेकवेळा संप, आंदोलने, बैठका घेण्यात आल्या. पण माथाडी कामगरांचे प्रश्न जैसे थे आहेत. त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष पसरला असून संप पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना करुन त्यावर कामगारांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघटनांच्या प्रतिनिधींची सदस्य म्हणून नेमणूक करावी, विविध माथाडी मंडळाच्या पुनर्रचना करुन त्यावर युनियनच्या सभासद संख्येच्या प्रमाणात सदस्यांच्या नेमणुका करण्यात याव्यात, विविध माथाडी मंडळातील कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य दिले जावे, माथाडी कायदा व विविध माथाडी मंडळांच्या योजनेतील त्रुटी दूर करण्यासंबंधी विशेष समिती गठीत करण्यात यावी, विविध रेल्वे यार्डात माथाडी कामगार व अन्य घटकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात.
तसेच माथाडी कामगारांच्या कामात अडथळा आणून कामगारांवर दहशत करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना आळा घालण्यासाठी संबंधितांची समिती गठीत करण्यात यावी. बाजार समितीच्या मापाडी/तोलणार कामगारांना बाजार समितीच्या कार्यालयीन सेवेत घेण्यात यावे, सिडकोमार्फत माथाडी कामगारांना नवी मुंबई परिसरात तयार घरे दिली जावीत या सारख्या आदी मागण्या माथाडी कामगारांनी केल्या आहेत.