लाल रंगाची साडी व हातात लाल कापडात गुंडाळलेला अर्थसंकल्प घेऊन निर्मला सितारमण संसदेत हजर

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

लाल रंगाची साडी व हातात लाल कापडात गुंडाळलेला अर्थसंकल्प घेऊन निर्मला सितारमण संसदेत हजर

नवी दिल्ली, (प्रबोधन वृत्तसेवा) - अर्थमंत्री निर्मला सितारमण आज मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत कारण पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणुकांमुळे अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. जया एकादशीही बुधवारी आहे आणि यावेळी अर्थमंत्री निर्मला सितारमण हातात लाल लेजर घेऊन लाल साडी नेसून राष्ट्रपती भवनात पोहोचल्या. निर्मला सितारमण यांची वेगळी स्टाइल प्रत्येक बजेटमध्ये पाहायला मिळत आहे. निर्मला सितारमण आपल्या कार्यकाळातील 5 वा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

सितारमण यांनी टॅबलेटद्वारे अर्थसंकल्पीय भाषण वाचण्यास सुरुवात केली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर 2021 मध्ये पहिल्यांदाच संपूर्णपणे पेपरलेस डिजिटल बजेट संसदेत सादर करण्यात आले. अर्थसंकल्पाची प्रत छापण्याची परंपरा बंद झाली आहे.

गेल्या वर्षी अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी गडद तपकिरी रंगाची साडी नेसली होती. तो कोविडचा काळ असल्याने प्रत्येकजणाने मास्क घातला होता. सर्वाधिक प्रदीर्घ भाषण देण्याचा विक्रम सितारमण यांच्या नावावर आहे. त्यांनी 2020-21 चा अर्थसंकल्प 2 तास 42 मिनिटे सादर केला. भारताचा सर्वसाधारण अर्थसंकल्प आतापर्यंत केवळ दोन महिलांनी सादर केला आहे. 1970 मध्ये इंदिरा गांधींनी पहिल्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करून इतिहास रचला आणि 2019 मध्ये अर्थमंत्री निर्मला सितारमण यांचे नाव या यादीत समाविष्ट करण्यात आले.