प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधणे योग्य नाही – मोहन भागवत
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
नागपूर (प्रबोधन न्यूज) - मंदिर-मशीदबाबत देशात वाद सुरू आहे. ऐतिहासिक वास्तूंच्या हिंदू भूतकाळाबद्दलच्या याचिकाही न्यायालयात प्रलंबित आहेत. कुतुबमिनार असो, जामा मशीद असो की ताजमहाल, त्यांच्याबाबत नवनवीन दावे समोर येत आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत आहे.
ग्यापवापी मशिदीवर हिंदू आणि मुस्लिम बाजू समोरासमोर आहेत. त्याची धग आता इतर राज्यांमध्येही पोहोचली आहे. कर्नाटकातील जामा मशिदीबाबतही असाच दावा करण्यात आला असून, कुतुबमिनार आणि ताजमहालच्या सर्वेक्षणाची मागणीही जोर धरू लागली आहे. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे एक विधान चर्चेत आले आहे. प्रत्येक मशिदीत शिवलिंगाचा शोध घेणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याचे अनेक पक्षांनी स्वागत केले आहे. यात अनेक विरोधी पक्षांचाही सहभाग आहे.
संघ प्रमुख मोहन भागवत संघ शिक्षा वर्ग, तृतीय वर्ष 2022 च्या समारोप समारंभात नागपुरात होते. त्यांनी येथे दिलेल्या भाषणाची सर्वत्र चर्चा होत आहे. संघप्रमुख म्हणाले, इतिहास हा असतो जो आपण बदलू शकत नाही. ते ना आजच्या हिंदूंनी बांधले ना आजच्या मुसलमानांनी, त्याकाळी घडले. प्रत्येक मशिदीत शिवलिंग का शोधायचे? हे योग्य नाही. आम्हाला वाद का वाढवायचा आहे? रोज नवीन केस आणू नये.
शिवसेनेने संघप्रमुखांच्या वक्तव्याचे स्वागत केले आहे. शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले, त्यांच्या वक्तव्याला माझा पाठिंबा आहे. ही दैनंदिन अराजकता संपली पाहिजे, अन्यथा देशाचे नुकसान होईल. मशिदींमध्ये शिवलिंग शोधण्यापेक्षा काश्मिरी पंडितांचे प्राण कसे वाचवता येतील याचा विचार करायला हवा.
जेडीयू नेते आणि बिहार सरकारमधील मंत्री बिजेंद्र प्रसाद म्हणाले की, देश अनावश्यक वादात अडकत आहे. कायद्यात प्रत्येक समस्येवर उपाय आहे, पण धर्माच्या नावाखाली विनाकारण तणाव वाढवण्याचा प्रयत्न होता कामा नये.
देवबंदचे उलेमा मुफ्ती असद कासमी यांनीही संघप्रमुखांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. ते म्हणाले की, देशात शांतता आणि सलोखा कसा प्रस्थापित व्हावा, अशी सर्व देशवासीयांची इच्छा आहे. मंदिर-मशीद राजकारणात अडकलो तर देश उद्ध्वस्त होईल.