महाविद्यालयीन काळातील संस्कार करिअरसाठी दीपस्तंभ प्रमाणे - डॉ. गोविंद कुलकर्णी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

महाविद्यालयीन काळातील संस्कार करिअरसाठी दीपस्तंभ प्रमाणे - डॉ. गोविंद कुलकर्णी

कल्पतरू कार्यक्रमात पीसीसीओई च्या माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पिंपरी - आपण यशाचे शिखर गाठले तरी महाविद्यालयीन काळातील संस्कार हे करिअरसाठी दीपस्तंभा प्रमाणे मार्गदर्शक असतात हे विसरून चालणार नाही, असे प्रतिपादन पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयातील (पीसीसीओई) माजी विद्यार्थ्यांच्या "कल्पतरू" या मेळाव्याचे आयोजन शनिवारी (दि.२८) पीसीईटीच्या सभागृहात करण्यात आले होते.

यावेळी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिष्ठाता डॉ. शितलकुमार रवंदळे म्हणाले की, आज विविध क्षेत्रात पीसीसीओईचे २२ वर्षातील हजारो माजी विद्यार्थी जबाबदार नागरिक म्हणून देशाच्या विकासात योगदान देत आहेत. अनेक विद्यार्थी परदेशात मोठ्या पदांवर काम करून देशाचे तसेच आपल्या महाविद्यालयाचे नाव उंचावत आहेत. याचा पीसीईटीच्या विश्वस्त मंडळासह सर्व प्राध्यापक व कर्मचारी वर्गाला अभिमान आहे. गेल्या ३२ वर्षात ट्रस्टने उभारलेल्या पायाभूत सुविधा आणि विविध कोर्सेसची माहिती सर्वांसमोर यावी म्हणून माजी विद्यार्थ्यांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमात ४०० पेक्षा अधिक माजी विद्यार्थी आणि ३०० शिक्षक वर्ग सहभागी झाले होते. माजी विद्यार्थी असोसिएशनचे मुख्य संयोजक प्रा.आनंद बिराजदार तसेच माजी विद्यार्थी प्रसाद श्रीरामे, आरती भडे, विशाल गोरडे, डेनिस थॉमस, तेजस्विनी बागुल, रचना कुमार यांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या करिअरमध्ये कॉलेजचे योगदान विशद केले. कॉलेजची शिस्त ही दैनंदिन जीवनात उपयोगी पडत असल्याचे मत बऱ्याच विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

यावेळी पीसीसीओई माजी विद्यार्थी असोसिएशनच्या पाच वर्षांच्या कार्यकारी मंडळात अध्यक्ष डेनिस थॉमस, उपाध्यक्ष बसवराज वामा, महिला प्रतिनिधी कांचन कुलकर्णी तर सदस्य म्हणून संतोष पुजारी शर्वरी गायकवाड, जगजीत कुलकर्णी, रजत गुप्ता, सौरभ बेदमुथा, वसुंधरा सिंग, संपदा कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. सल्लागार म्हणून कार्यकारी संचालक डॉ.गिरीश देसाई, संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिष्ठाता डॉ.शितलकुमार रवंदळे हे काम पाहणार आहेत. आभार माजी विद्यार्थी असोसिएशनचे मुख्य संयोजक प्रा.आनंद बिराजदार यांनी मानले. प्रा.आनंद बिराजदार तसेच केतन देसले, अश्विनी लाडेकर, श्रीयश शिंदे, निखिल सुरवडे, शैलेंद्र गलांडे, अनघा चौधरी, तनुजा पाटणकर, राहुल पितळे, सांत्वना गुदढे तसेच विभागप्रमुख सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, स्वयंसेवक विद्यार्थी यांनी मेळावा यशस्वी केला.