डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्पर्धा आजपासून - वरिष्ठ विभागीय सात संघांसह 14 संघांचा सहभाग  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्पर्धा आजपासून - वरिष्ठ विभागीय सात संघांसह 14 संघांचा सहभाग  


 
पिंपरी, (प्रबोधन न्यूज )  -  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्पर्धेला उद्या सोमवारपासून (दि. 26) सुरुवात होत आहे. स्पर्धेत वरिष्ठ विभागीय गटातील सात संघांसह एकूण 14 संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील सामने मेजर ध्यानचंद हॉकी मैदानावर होणार आहेत.
 
डॉ. आंबेडकरांच्या 132 व्या जयंती निमित्ताने या स्पर्धेचे आयोजन हॉकी महाराष्ट्राच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. स्पर्धा पूर्णपणे बाद फेरी पद्धतीने खेळविण्यात येईल. स्पर्धेत आयकर, पुणे, एक्‍सलन्सी हॉकी अकादमी, क्रीडा प्रबोधिनी, मद्य रेल्वे, पुणे, जीएसटी-कस्टम्स, पुणे शहर पोलीस, रेल्वे पोलीस लाइन बॉईज, पीसीएमसी अकादमी असे वरिष्ठ गटातील संघ सहभागी होणार आहेत. बरोबरीनेच खडकी हॉकी अकादमी, किड्‌स इलेव्हन, फ्रेंडस युनियन, हॉकी लव्हर्स अकादमी, हॉकी लव्हर्स स्पोर्टस क्‍लब, पूना हॉकी अकादमी असे कुमार गटातील संघही सहभागी होणार आहेत.
दररोज दोन सामने होणार असून, अंतिम सामना रविवारी (दि. 2 जुलै) होईल, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्पर्धा समितीचे अध्यक्ष महेंद्र निकाळजे यांनी दिली. विजेत्या, उपविजेत्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी आकर्षक करंडकासह अनुक्रमे रोख 20, 10 आणि 5 हजार रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत.

आजचे सामने : आयकर, पुणे विरुद्ध हॉकी लव्हर्स अकादमी, दुपारी 1.30 वाजता. फ्रेंडस युनियन विरुद्ध पीसीएमसी अकादमी, दुपारी 3 वाजता.