महाविकास आघाडीचा आज थेरगाव येथे आभार मेळावा

चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या पाठीशी मतदारसंघातील नागरिकांनी मतदारांनी मोठी ताकद उभी केली होती.

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

महाविकास आघाडीचा आज थेरगाव येथे आभार मेळावा

पिंपरी - महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिलेल्या जनतेचे आभार व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने थेरगाव येथे गुरुवारी (दि. ९) आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी दिली आहे.

याबाबत अजित गव्हाणे यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात म्हटले आहे की, नुकत्याच झालेल्या चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या पाठीशी मतदारसंघातील नागरिकांनी मतदारांनी मोठी ताकद उभी केली होती. जनतेने आमच्यावर दाखविलेल्या विश्वासास आम्ही कधीही तडा जावू देणार नाही. जनतेने दाखविलेला विश्वासाबद्दल आम्ही त्यांचे नक्कीच ऋणी राहू. मात्र त्यांचे आभार मानणे हे देखील आमचे कर्तव्य आहे. या कर्तव्याच्या भावनेतून उद्या (दि. ९) थेरगाव येथील संतोष मंगल कार्यालयामध्ये सायंकाळी ६ वाजता आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यासाठी चिंचवड विधानसभेचे निरीक्षक आमदार सुनिल शेळके, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन भोसले, काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे या प्रमुख मान्यवरांची हजेरी असणार आहे. यावेळी महाविकास आघाडीतील सहभागी पक्षांचे सर्व माजी नगरसेवक, नगरसेविका, सर्व सेलचे अध्यक्ष, कार्यकारणी, प्रभाग- वॉर्डाध्यक्ष, सर्व केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहनही अजित गव्हाणे यांनी केले आहे.