हिंदू जन आक्रोश मोर्चावरून उद्धव ठाकरेंची केंद्र सरकारवर सडकून टीका

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

हिंदू जन आक्रोश मोर्चावरून उद्धव ठाकरेंची केंद्र सरकारवर सडकून टीका

निवडणुका जवळ आल्या की, भाजपला हिंदू खतरेंमेचा साक्षात्कार होतो

केंद्र व राज्यात हिंदूंची सत्ता असूनही हिंदू धोक्यात कसा ?

हे मोर्चे व आंदोलन म्हणजे स्वतःच्या नामर्दानगीवर पडदा टाकण्याचाच प्रकार

मुलायम सिंह यादव यांना देण्यात आलेल्या पद्म विभूषण नागरी पुरस्कारावरून घणाघात

मुंबई - राज्यातील इतर शहरांपाठोपाठ मुंबईतही हिंदू जन आक्रोश मोर्चा निघाला. याच मोर्चावरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं काही मुद्द्यांवर मोदी-शहांसह भाजपवर सामन्यातील अग्रलेखामधून बोचरी टीका करीत भाजपची पोलखेल केली आहे.

पराभवाचे हादरे बसू लागले की, भाजप त्यांचा हुकमी खेळ सुरू करीत असतो. आताही त्यांनी हिंदू-मुसलमान हा खेळ सुरू केला आहे. देशभरातील हिंदू अचानक 'खतऱ्या'त आला असून, धर्मांतरविरोधी कायदा, 'लव्ह जिहाद' अशा मुद्द्यांवर भाजप व त्यांच्या मिंधे गटानं मुंबईत 'हिंदू जन आक्रोश मोर्चा' काढला असल्याची टीका अग्रलेखात करण्यात आली आहे.

अनेक हिंदुत्ववादी संघटना या मोर्चात सहभागी झाल्याचं सांगितलं गेलं, पण आघाडीवर भाजपचेच लोक होते. 'आम्ही सगळे हिंदू म्हणून या मोर्चात सहभागी झालो आहोत,' असं या मंडळींनी जाहीर केलं, पण हे मोर्चे व आंदोलन म्हणजे स्वतःच्या नामर्दानगीवर पडदा टाकण्याचाच प्रकार आहे, अशा शब्दात ठाकरेंनी भाजपवर हल्ला चढविला आहे.

महाराष्ट्रात व केंद्रात प्रखर हिंदुत्ववादी वगैरे सरकार आहे. मग तुमचे हिंदुत्व खतऱ्यात येतेच कसे? गेल्या आठ वर्षांपासून केंद्रात मोदी-शाहांचं रामराज्यच चाललं आहे व हे राज्य म्हणजे हिंदूंचा स्वर्ग असल्याचं त्यांचेच लोक सांगतात. तरीही हिंदूंचा 'आक्रोश मोर्चा' निघावा हे आश्चर्यच म्हणायला हवं. केंद्रात किंवा महाराष्ट्रात 'मुस्लिम लीग' किंवा 'एमआयएम'सारख्यांचं राज्य असतं, तर 'हिंदू आक्रोश मोर्चा'ला अर्थ होता अशीही बोचरी टीका करण्यात आली आहे.

प्रजासत्ताक दिनी मोदी सरकारनं मुलायम यांना पद्मविभूषणानं गौरवान्वित केलं. हा राम मंदिरासाठी बलिदान केलेल्या हजारो कारसेवकांचा अपमान आहे. कारण या हिंदू कारसेवकांना गोळ्या घालून ठार करण्याचे आदेश मौलाना मुलायम यांचेच होते. त्यांना पुरस्कार म्हणजे मोदी व शहांचा नामर्दानगीपणाच आहे.

आजही सकल हिंदूंसाठी शिवसेना व शिवसेना भवन हेच एकमेव आणि शेवटचं आशास्थान आहे. त्यामुळे त्यांच्या आक्रोशाला नक्की न्याय मिळेल. शक्तिमान हिंदू महाशक्तीचं कान बधिर झाले असले तरी शिवसेना भवन हिंदूंच्या आक्रोशाची नक्कीच दखल घेईल, असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला डिवचलं आहे.