खंडोबा माळ ते बर्ड व्हॅली चौकापर्यंत रस्ता दुरुस्त करुन सुशोभीकरण करा - राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल बाळासाहेब काळभोर यांची मागणी

खंडोबा माळ ते बर्ड व्हॅली चौकापर्यंत रस्ता दुरुस्त करुन सुशोभीकरण करा - राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल बाळासाहेब काळभोर यांची मागणी

ऐश्वर्यम सोसायटी लगत असलेला आरक्षित भुखंड विकसित करा

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल बाळासाहेब काळभोर यांची मागणी

पिंपरी , (प्रबोधन न्यूज )-  आकुर्डी खंडोबा माळ चौक ते बर्ड व्हॅली चौकापर्यंत मोठ्या प्रमाणात उद्योग आहेत. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या वाहनांची सातत्याने वर्दळ असते. याच कारणामुळे रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. हा रस्ता तत्काळ दुरुस्त करून सुशोभीकरण करावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल बाळासाहेब काळभोर यांनी केली आहे. तसेच ऐश्वर्यम सोसायटी लगत असलेला आरक्षित भुखंडावर 
सर्व सुविधांसह उद्यान विकसित करावे, अशी मागणीही काळभोर यांनी केली आहे.

याबाबत विशाल काळभोर यांनी अ क्षेत्रिय अधिकारी सुचेता पानसरे यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात काळभोर यांनी म्हटले आहे की, 
आकुर्डी खंडोबा माळ चौक, परशुराम चौक ते बर्ड व्हॅली चौकापर्यंत मोठ्या प्रमाणात उद्योग आहेत. या रस्त्यावर मोठ्या वाहनांची नेहमी वर्दळ असते. या रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होऊन वाहन चालकांमध्ये वादावादी, लहान मोठे अपघातही होत आहेत. 
तसेच या रस्त्यावरील बस थांबे सुद्धा सुस्थित नाही.

त्यामुळे या रस्त्यांची पाहणी करून स्मार्ट सिटी अंतर्गत संपूर्ण रस्ता दुरुस्त करावा. फुटपाथ, स्ट्रॉमवॉटर लाईन, स्पीडब्रेकर्स, दिशादर्शक फलक,  आकर्षक विद्युत पोल, रस्ताच्या दुतर्फा आकर्षक झाडे लावावीत. 

त्याचबरोबर ऐश्वर्यम सोसायटीमध्ये सुमारे ९०० हुन अधिक फ्लॅटधारक आहेत. या परिसरातील ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला व लहान मुलांसाठी एकही उद्यान नाही. या सोसायटीलगत पालिकेचा मोकळा आरक्षित भूखंड आहे. या भूखंडावर सर्व सुविधांसह उद्यान, जॉगिंग ट्रॅक व क्रिडांगण, ओपन जिम तसेच जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, लहान मुलांकरीता खेळनी बसवावीत, अशी मागणी काळभोर यांनी केली आहे.