निवडणुकीच्या तोंडावर भाजपला गळती
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
भाजप नगरसेविका चंदा लोखंडे यांचा राजीनामा
पिंपरी-चिंचवड, दि. 22 - पिंपळे गुरव प्रभाग २९ मधील भाजप नगरसेविका चंदा लोखंडे यांनी सोमवारी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे राजीनामा दिला आहे. त्यांचे पती राजू लोखंडे यांनी गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे त्याही राजीनामा देतील, अशी चर्चा होती. ‘भाजप नेते व सहकारी नगरसेवकांनी त्रास दिला व कोणतीही कामे होऊ दिली नाहीत, त्यामुळे राजीनामा दिला. पुढील भूमिका लवकरच जाहीर करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भाजपचे नगरसेवक वसंत बोराटे यांच्या पाठोपाठ चंदा लोखंडे यांनीही नगरसेवकपदाचा राजीनामा देत भाजपला दुसरा धक्का दिला. या पूर्वी नगरसेवक रवी लांडगे, नगरसेविका माया बारणे यांच्या सह भाजपच्या अनेक नगरसेवकांनी राष्ट्रवादी प्रवेशाचा मनोदय जाहीर केला आहे.
गत निवडणुकीच्या वेळी राज्यात भाजपचे सरकार होते. त्या वेळी राष्ट्रवादी मधून भाजपमध्ये जाणाऱ्यांची संख्या खूप मोठी होती. गल्ली ते दिल्ली भाजप, भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त शासन देणार अशा गाजावाजा करीत भाजप सत्तेवर आले होते. आता परिस्थिती बदलली आहे. राज्यात देवेंद्रचे सरकार जाऊन आघाडीचे सरकार आले आहे. पक्ष बदलून भाजपमध्ये गेलेल्या नगरसेवकांना पुन्हा राष्ट्रवादी पक्षामध्ये जाण्याचे वेध लागले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांच्याकडे भाजपने सर्व सूत्रे सोपविली होती. त्यांच्यापुढे पक्षामधून बाहेर पडणाऱ्या नगरसेवकांना थोपविण्याचे आव्हान आहे. ते ही जबाबदारी कशी पाडतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. जर ते यात अयशस्वी ठरले तर शहरात सत्तांतर अटळ असल्याचे जाणकारांचे मत आहे.