वसंत मोरे यांची शहराध्यक्षपदावरून उलचबांगडी
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
भोंगा विरोधाच्या आदेशाला धुडकावल्याने कारवाई
मनसे पुणे शहराध्यक्षपदी साईनाथ बाबर यांची निवड
मुंबई, दि. ७ मार्च - राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांसदर्भात घेतलेल्या भूमिकेला मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी उघड विरोध केला होता. त्यामुळे राज ठाकरे त्यांच्यावर नाराज होते. राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्षपदावरून उचलबांगडी केली आहे. आता त्यांच्याजागी साईनाथ बाबर यांची पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्याविरोधात घेतलेल्या भूमिकेची महाराष्ट्रात जोरदार चर्चा होत होती. त्यामुळे राज ठाकरे हे वसंत मोरे यांच्यावर नाराज असल्याचे सांगितले जात होते. वसंत मोरे हे पक्षाच्या स्थापनेपासून काम करत होते. ते अतिशय निष्ठावान म्हणून ओळखले जातात. मनसेच्या तिकीटावर ते नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. मात्र राज ठाकरेंच्या मशिदीवरील भोंग्याच्या विरोधाला मात्र त्यांनी निर्भीडपणे विरोध केला. त्यामुळे राज ठाकरे हे वसंत मोरेंची समजूत काढणार का असा सवाल निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी गुरुवारी शिवतीर्थवर पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला बाबू वागस्कर, अनिल शिदोरे, नगरसेवक साईनाथ बाबर यांना बोलावण्यात आले होते. तर वसंत मोरे यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. तेव्हाच वसंत मोरे यांच्यावर पक्षाकडून कारवाई होणार, याची कुणकुण लागली होती.
मनसेच्या ट्विटर हँडलवरून नव्या शहराध्यक्षाची बातमी देण्यात आली आहे. त्यात म्हटलं आहे की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज नगरसेवक श्री. साईनाथ संभाजी बाबर यांची पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या जबाबदारीसाठी श्री. साईनाथ बाबर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा!