नवाब मलिक मंत्रिपदाचा राजीनामा देणार ?

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

नवाब मलिक मंत्रिपदाचा राजीनामा देणार ?

मुंबई, दि. 23 - न्यायालयाने जर नवाब मलिक यांना पोलीस कोठडी सुनावली तर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता आहे. त्यांचा पदभार राष्ट्रवादी पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपविला जाऊ शकतो. आज सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक होणार आहे. त्यात त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

नवाब मलिकांचा राजकीय प्रवास

नवाब मलिक यांनी राजकारणाची सुरुवात समाजवादी पक्षातून केली, पण नंतर ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. समाजवादी पक्षात असताना ते मुलायमसिंह यादव यांच्या अतिशय जवळ होते. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ते सध्या शरद पवार यांच्या अतिशय जवळचे आहेत.

 

महाराष्ट्रात पाच वेळा आमदार राहिलेले नवाब मलिक यांचा जन्म 20 जून 1959 रोजी उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील उत्रौला तहसील भागातील धुसवा गावात झाला. नवाब मलिक यांचे संपूर्ण कुटुंब 1970 दशकामध्ये यूपीमधून मुंबईत स्थलांतरित झाले. त्यांनी मुंबईतील अंजुमन हायस्कूलमधून 10 वी आणि त्यानंतर 1978 मध्ये बुर्हानी कॉलेजमधून 12 वी पास केली. 1979 मध्ये त्यांनी पदवीसाठी याच महाविद्यालयात प्रवेश घेतला होता.

 

नवाब मलिक यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात व्यवसायापासून केली. मात्र या दरम्यान ते राजकारणाकडे ओढले गेले. त्यानंतर त्यांनी राजकारणाच्या क्षेत्रात उडी घेतली. नव्वदच्या दशकात देशात राम मंदिराची चळवळ सुरू झाली आणि अयोध्येत राम मंदिर उभारणीच्या विरोधात आवाज उठवणारे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांची लोकप्रियता अल्पसंख्याक समाजात झपाट्याने वाढली. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येतील बाबरीचा पाडाव झाला तेव्हा केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. बाबरी घटनेमुळे देशभरातील अल्पसंख्याक काँग्रेसवर प्रचंडे नाराज झाले आणि पर्याय म्हणून मुस्लिमांनी समाजवादी पक्षाची निवड केली.

 

मुस्लिमांमध्ये मुलायम यांची वाढती लोकप्रियता पाहून नवाब मलिक यांनीही सपामधून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. नवाब मलिक यांनी 1996 मध्ये महाराष्ट्रातील मुस्लिमबहुल नेहरू नगर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत सपाच्या तिकिटावर पहिल्यांदा नशीब आजमावले आणि विजयी झाले. 1999 च्या विधानसभा निवडणुकीत याच मतदारसंघामधून ते पुन्हा सपाच्या तिकिटावर निवडून आले.

 

2004 च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रात यूपीए सरकार सत्तेवर आल्यानंतर नवाब मलिक यांनी समाजवादी पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या नंतर 2004 च्या विधानसभा निवडणुकीत नवाब मलिक यांनी नेहरू नगर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर उतरले आणि विजयाची हॅटट्रिक केली.

 

2009 च्या विधानसभा निवडणुकीत नवाब मलिक यांनी अनुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले.

 

2014 ची विधानसभा निवडणूक त्यांनी अणुशक्तीनगर विधानसभेतून पुन्हा लढवली, पण शिवसेनेकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. 2010 च्या विधानसभा निवडणुकीत नवाब मलिक पुन्हा येथून लढले आणि पाचव्यांदा आमदार झाले.

 

महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर राष्ट्रवादी कोट्यातून त्यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले. 2020 मध्ये मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्षही करण्यात आले.