खासदार अमोल कोल्हे शरद पवारांच्या भेटीला

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

खासदार अमोल कोल्हे शरद पवारांच्या भेटीला

पुणे , (प्रबोधन न्यूज )  -  राज्याच्या राजकारणात कालपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याची चर्चा सुरू आहे. अजित पवारांनी काल खासदार अमोल कोल्हेंविरोधात दंड थोपटले आणि अमोल कोल्हेंना निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटलांनी जिवाचं रान केलं, पण यावेळी पाडणार म्हणजे पाडणारच, असे ते म्हणाले. काल अजित पवारांनी ते वक्तव्य केले. त्यानंतर आज सकाळीच ते अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात पाहणी करण्यासाठी पोहोचले. त्यानंतर खासदार अमोल कोल्हे शरद पवारांच्या भेटीला दाखल झाले. शरद पवारांच्या मोदी बागेतील कार्यालयात ही भेट झाली आहे.

या भेटीनंतर खासदार अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी या भेटीचे कारण देखील सांगितले आहे. शेतकरी मोर्चा उद्या(बुधवार) पासून सुरू होत आहे. २७ ते ३० डिसेंबर यादरम्यान हा मोर्चा पार पडणार आहे. शिवनेरीच्या पायथ्यापासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. कांदा प्रश्न, पीक विमा, दुधाचे दर, शेतक-यांना कर्जमाफी याशिवाय इतर मागण्यांसाठी शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

याबाबत शरद पवार यांचे मार्गदर्शन घेतले, याबाबत चर्चा झाल्याचे अमोल कोल्हेंनी यावेळी सांगितले आहे. त्याचबरोबर ३० तारखेला शरद पवारांची सभा पार पडणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
अजित पवार मोठे नेते आहेत. मी काय एक कार्यकर्ता आहे. त्याच्याबाबत मी काय बोलणार. अजित पवारांनी जेव्हा कान धरण्याचा आधिकार होता तेव्हा कान धरला असता तर सोपे झाले असते असेही ते पुढे म्हणाले.

तर अजित पवारांच्या दौ-याबाबत आणि पाहणीबाबत ते म्हणाले की, मी त्यांचा आभारी आहे. ते पुण्याचे पालकमंत्री आहेत. तर यासंदर्भातील पाहणी आम्ही ६ महिन्यांपूर्वीच केली आहे. त्यानंतर मांजरी उड्डाणपूल लवकरात लवकर नागरिकांसाठी खुला करावा अशी मागणी अजित पवारांकडे केली होती. त्यांनी ही पाहणी केली त्यामुळे माझ्या मतदार संघातील नागरिकांसाठी सोयीचा निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले आहेत.

अजित पवार मोठे नेते आहेत. त्यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने मला आव्हान देणे, हा मी माझा गौरव समजेन, ते आमचे नेते होते. त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणे हे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला शोभणारे नाही. त्यांच्याबाबतचा आदर कायमच मनात आहे. तो व्यक्ती म्हणून तसाच राहील. राजकीय भूमिका आता बदलली असल्याने त्यांचे असे काही विधान असेल तर मी त्यांना भेटून हे समजून घेईन, असेही कोल्हे पुढे म्हणाले आहेत.