मोदीजी, किमान जनतेच्या श्वासावर तरी GST लावू नका – मोहन जोशी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

मोदीजी, किमान जनतेच्या श्वासावर तरी GST लावू नका – मोहन जोशी

पुणे, (प्रबोधन न्यूज) - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या आनंदात देशातील जनता असताना केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारने जनतेच्या रोजच्या गरजेच्या जीवनावश्यक वस्तूंवर नवा ५% GST लावून भाजपचे मोदी सरकार जनता विरोधी आहे हे पुन्हा सिद्ध केले आहे. गहू, गव्हाचा आटा, तांदूळ, पोहे, मुरमुरे, ज्वारी, बाजरी, गुळ, दही, पनीर अशा असंख्य जीवनावश्यक वस्तूंवर नवा ५% जीएसटी लावत असताना आता किमान जनतेच्या श्वसावर तरी भाजपच्या मोदी सरकारने जीएसटी लावू नये अशी उपरोधिक प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

या संदर्भात मोहन जोशी यांनी सांगितले की केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारला प्रत्येक आघाडीवर अपयश आले असून नोटाबंदी, जीएसटीची घाईने चुकीची अंमलबजावणी याबरोबरच मोठ्या मुठभर उद्योगपतींना धार्जिणे आर्थिक धोरण यामुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. प्रचंड महागाई व बेकारी जनता भोगत आहे. जनतेच्या श्वासावर जीएसटी लावणे एवढेच आता बाकी राहिले आहे, असे मोहन जोशी यांनी म्हटले आहे.