पुण्याच्या वाहतूक कोंडीवर माझ्याकडं बेस्ट उपाय, दादा तुम्ही फक्त प्रेझेंटेशन बघा!- नितीन गडकरी
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे , (प्रबोधन न्यूज ) - अलिकडच्या काळात पुण्यातील वाहतूक कोंडीत पुण्यातील वाहतूक कोंडीत मोठी वाढ झाली आहे. अशात केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील वाहतूक कोंडीवर उपाय सुचवला आहे. माझ्याकडे पुण्यासाठी हवेतून चालणाऱ्या स्कायबसची कल्पना आहे. माझी अजित दादा पवार आणि चंद्रकांत दादा पाटील यांना एकदा विनंती आहे की, त्यांनी एकदा याचं एकदा प्रेझेंटेशन पहावं. पुण्यातील वाहतुक कोंडीवर हा चांगला पर्याय होईल, असं नितीन गडकरी म्हणालेत. शिवाय पुणे शहराच्या विकासाचा आराखडाही त्यांनी सांगितला. पुढची विकासाची दिशाही त्यांनी स्पष्ट केली.
पुण्याला आता डबल इंजिन लागलं आहे. आधी एक दादा होते. आता दोन दादा झालेत आणि दादा दादाच आहेत, अशी टिपण्णी करत गडकरी यांनी पुण्यातील विकासाला आता चालना मिळेल, असं सांगितलं. पुणे शहरासाठी 40 हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार आहे. दोन-तीन मजली उड्डाणपुलांचाही यात समावेश आहे, असं म्हणत नितीन गडकरी यांनी पुण्याच्या विकासाचा रोडमॅप समजावला.
माझं खातं भ्रष्टाचारमुक्त आहे. त्यामुळे मी ठेकेदारांना शिव्या घालतो. येणाऱ्या पाच वर्षात आपला देश ऑटोमोबाईलमध्ये एक नंबरला आला पाहिजे, त्यासाठी पुण्याचं महत्व अधिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही देशाला पुढे घेऊन जाऊ, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.
चांदणी चौकातील या उड्डाणपुलाच्या कामात अनेक अडचणी आल्यात. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भूसंपादनासंदर्भात चांगला निर्णय घेतला होता. अधिकाऱ्यांनीही रात्रंदिवस काम केलं. काही लोकं हे सुप्रीम कोर्टात गेले होते. या प्रकल्पावर 1 हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत, असंही गडकरी यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितलं.
पुण्याच्या विकासासाठी चाळीस हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आलाय. यामधे दोन- तीन मजली उड्डाणपूल आहेत. आता पुणे वाढवू नका. आहे तेवढंच राहू द्या. गर्दी करू नका. आहे त्या पुण्याला प्रदूषणमुक्त ठेवा. नवीन रिक्षा परमिट देताना एकतर इथेनॉल किंवा इलेट्रीक रिक्षाना दिलं. तर पुणे प्रदुषणमुक्त होईल, असंही गडकरींनी सांगितलं.