हेमंत रासने विरुद्ध रवींद्र धंगेकर यांच्यात होणार थेट लढत
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे (प्रबोधन न्यूज) – भारतीय जनता पक्षाने कसबा पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने यांची उमेदवारी जाहीर केली त्यानंतर आता काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. धंगेकर हे महाविकास आघाडीचा पाठिंबा असणार आहे. भाजप व शिंदे गट तसेच राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीला बिनवरोध निवडणूक करण्याची विनंती केली होती. पण ही विनंती धुडकावित महविकास आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे आता निवडणूक चुरशीची होणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काही तास आधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उमेदवाराच्या नावाची घोषणा केली. नाना पटोले यांनी एक ट्विट केलं आहे, ज्यात त्यांनी म्हटलं आहे की, "पुणे जिल्ह्यातील कसबा मतदार संघात विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित लढणार आहेत. कसबा मतदारसंघाची जागा कॉंग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला असून येथून श्री. रवींद्र हेमराज धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे."
कसबा पेठ पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासूनच रवींद्र धंगेकर यांचं नाव काँग्रेसमध्ये चर्चेत होतं. काही दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर एक विधान केलं होतं. "गेल्या तीस वर्षांपासून राजकीय जीवनात असून, कसबा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. मला उमेदवारी दिल्यास तेथूनच कसबा मतदारसंघात विजयाची नांदी सुरू होईल," असं धंगेकर म्हणाले होते. आता काँग्रेसनं धंगेकरांना उमेदवारी दिली असून, ते पक्षाचा विश्वास सार्थ ठरवणार का? हे निकालानंतर दिसेल.
रवींद्र धंगेकर हे भाजपच्या हेमंत रासने यांच्यासमोर तगड आव्हान असल्याची चर्चा पुण्यात सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे पक्षाकडून उमेदवारी मिळणार असल्याचं निश्चित झाल्यानंतर धंगेकर यांनी केसरीवाड्यावर जाऊन दिवगंत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. पती शैलेश टिळक, मुलगा रोहित टिळक, कुणाल टिळक यांच्यासोबत त्यांनी संवाद साधला.
कोण आहे रवींद्र धंगेकर ?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू व जवळचे सहकारी अशी त्यांची एकेकाळी ओळख होती. जानेवारी 2017 मध्ये त्यांनी अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शिवसेनेचे नगरसेवक म्हणून 10 वर्षे नंतर मनसेचे नगरसेवक म्हणून 10 वर्षे पुणे महापालिकेत काम केले आहे. खासदार गिरीश बापट यांचे कट्टर विरोध म्हणूनही त्यांची ओळख आहे. धंगेकर यांनी 2009 मध्ये गिरीश बापट यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचा अवघ्या 7 हजार मतांनी पराभव झाला होता. आता पुन्हा काँग्रेसने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली आहे.