एनडीएच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज मुंबई दौऱ्यावर

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

एनडीएच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज मुंबई दौऱ्यावर

मुंबई, (प्रबोधन न्यूज) - एनडीएच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. मुंबईत द्रौपदी मुर्मू या भारतीय जनता पक्षाचे आमदार व खासदार आणि एकनाथ शिंदे गटाचे आमदार यांची भेट घेणार आहेत. आज दुपारी 2:30 वाजेच्या दरम्यान द्रौपदी मुर्मू या मुंबईत दाखल होणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विमानतळावर जाणार आहेत. त्यानंतर विमानतळ परिसरात असलेले पंचतारांकित हॉटेलमध्ये द्रौपदी मुर्मू भारतीय जनता पक्षाचे आमदार व खासदार आणि एकनाथ शिंदे गटाच्या सर्व आमदार त्यांची भेट घेणार आहेत.

दरम्यान, शिवसेनेकडून पाठिंबा जाहीर करण्यात आल्यानंतरही द्रौपदी मुर्मू यांच्या बैठकीचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण पाठवण्यात आलं नव्हतं. मात्र आता मुर्मू-ठाकरे भेट घडवून आणण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे मध्यस्थी करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेना खासदारांसोबत झालेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी आपण द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतिपदासाठी पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं. मात्र तरीही ठाकरे आणि भाजप नेत्यांमधील दरी कमी झाली नव्हती. तसंच मुर्मू या मुंबई दौऱ्यावर असल्या तरीही त्या उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'वर जाणार नसल्याचं सांगितलं जात आहे. मात्र ठाकरे कुटुंब आणि भाजपमध्ये निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी आता विनोद तावडे यांच्या माध्यमातून प्रयत्न होत असल्याचं दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्याशीही तावडे यांचे चांगले संबंध आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेतृत्वाकडून विनोद तावडे यांच्यावर उद्धव ठाकरे आणि द्रौपदी मुर्मू यांची भेट घडवून आणण्याची जबाबदारी देण्यात आल्याचे समजतंय. मात्र ही भेट मातोश्रीवर होणार नसून, बाहेर एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये होईल असे सांगितलं जात आहे.