“सगळ्यांचे मुखवटे उतरवून जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही" संजय राऊत कडाडले

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

“सगळ्यांचे मुखवटे उतरवून जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही" संजय राऊत कडाडले

मुंबई, दि. 2 मार्च - जे मोठ्या वार्ता करतात, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करतात, ते सर्व जेलमध्ये जाणारच. महाराष्ट्र सरकार, येथील तपास यंत्रणा आणि पोलिस अनेक गोष्टींचा तपास करण्यासाठी सक्षम आहेत, अशा शब्दांत शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी भाजपला इशारा दिला आहे. राऊत हे एका पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी त्यांनी किरीट पिता-पुत्रांसह भाजपवरही टिकास्त्र सोडले.

ते पुढे म्हणाले की, बाप-बेटे जेलमध्ये जाणार. आतापर्यंत तुम्ही इतरांना धमक्या देत होता, याला जेलमध्ये पाठवीन, त्यांना जेलमध्ये पाठवीन. मग तुम्ही अटकपूर्व जामीनासाठी धावपळ का करताय? मी जे साडेतीन म्हणालो, ते तुम्ही मोजत राहा." असे म्हणत संजय राऊत यांनी सोमय्यांवर हल्लाबोल केला.

आर्यन खानचे कोणत्याही ड्रग्ज रॅकेटशी संबंध असल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचेही एनसीबीच्या एसआयटीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे एनसीबीने कट रचून आर्यन खानला अडकवण्याचे प्रयत्न केले. अशी टीका राऊत यांनी केली आहे.

राऊत पुढे म्हणाले की, त्या साडेतीन लोकांची नावे जाहीर केली, तर ते अटकपूर्व जामिनासाठी जातात. जसजशी त्यांना अटक होईल, तस-तशी माहिती तुम्हाला समजेलच. पण माझे शब्द लिहून ठेवा, हे बाप-बेटे आणि इतरही काही लोक, जे मोठमोठ्या गप्पा करतात, ते सगळे तुरुंगात जाणार आहेत. हे एक प्रकरण नाही. अनेक प्रकरणे आहेत, ज्यामध्ये हे बाप-बेटे जेलमध्ये जाणार आहेत. त्याच्याबरोबर अनेक अधिकारी, केंद्रीय तपास यंत्रणांनी जे घोटाळे करुन ठेवले आहेत. यातली काही प्रकरणे मी पंतप्रधान कार्यालयाकडे सुपूर्द केली आहेत.