राज्यात पत्रकारांचीच हत्या होत असेल तर परिस्थिती चिंताजनक – शरद पवार

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

राज्यात पत्रकारांचीच हत्या होत असेल तर परिस्थिती चिंताजनक – शरद पवार

नाशिक, (प्रबोधन न्यूज) - सध्या कायदा सुव्यवस्थेवर लक्ष देणे ज्यांची जबाबदारी आहे, ते लक्ष देत नाहीत असे म्हणायला वाव आहे. कोकणात पत्रकाराची हत्या झाली आहे. या प्रश्नावर आता पत्रकारांवरच ही वेळ आली आहे, राज्यात आता काय परिस्थिती आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे असे राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. तसेच, रोज खून, अपघात, चोरी अशा घटना वाढत चालल्या आहेत. त्याबाबतही पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे.

नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, 'आता मुंबई महापालिका निवडणुका जवळ येत आहेत. त्या त्यांना जास्त महत्त्वाच्या वाटत असल्याच त्यांच्या या दौऱ्यातून दिसत आहे असे म्हणत पंतप्रधान मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई दौरा करत असल्याचे समोर आले आहे. मात्र, काही हरकत नाही. ते जर महाराष्ट्राला काही देणार असतील, राज्याचे काही हीत करत असतील तर विरोध करायचे आमचे काही कारण नाही. पण इथे येऊन राजकीय भाषणे करणार असतील, तर त्याचा विचार त्यांनीच करावा असा टोलाही पवार यांनी लगावला आहे.

नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा बोलून दाखवल्यामुळे चांगलीच चर्चा रंगली आहे. पण 'अजित दादा मुख्यमंत्री व्हावे ही अनेकांची इच्छा असली तरी ती आमच्याकडे संख्याबळ नाही, संख्याबळ असते तर आमच्या सहकारी पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला असता' असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. शरद पवार हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर दिलखुलास संवाद साधला आहे.