राज्यात महापूर, पण सरकार कुठंय? मंत्रिमंडळाचा पत्ता नाही – संजय राऊत

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

राज्यात महापूर, पण सरकार कुठंय? मंत्रिमंडळाचा पत्ता नाही – संजय राऊत

मुंबई, (प्रबोधन न्यूज) - राज्यात महापुराने थैमान घातले आहे. मात्र, सरकार स्थापन होऊन 14 दिवस उलटल्यानंतरही मंत्रिमंडळाचे अस्तित्व नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनता सध्या वाऱ्यावर आहे, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली. तसेच, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आता राज्य सरकारला मार्गदर्शन का करत नाही, असा खोचक सवालही त्यांनी विचारला आहे.

उठसुठ महाविकास आघाडीच्या सरकारला सल्ले देणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मागील 12 दिवसांपासून गायब आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. राऊत म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी राज्यात पूर आलेला असताना परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व मंत्रिमंडळ, प्रशासन रस्त्यावर असतानाही राज्यपालांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. मात्र, आता महाराष्ट्र संकटात असताना सरकारही अस्तित्वात नाही. 2 वर्षांपूर्वी राज्याच्या दौऱ्यावर निघालेले राज्यपाल आता राजभवनाच्या बाहेरही निघत नाहीत. त्यांच्या मार्गदर्शनाची सरकारला आता खरी गरज आहे. मविआला वारंवार सल्ले देणारे राज्यपाल आताच्या सरकारला मार्गदर्शन का करत नाही, असा सवाल राऊतांनी केला आहे.

दरम्यान, राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 84 जणांचा मृत्यू झाला आहे. ठिकठिकाणी पुरात लोक वाहून गेल्याच्या घटना घडत आहेत. रस्त्यांवर दरड कोसळण्याच्या घटना तसेच पुलांवरून पुराचे पाणी वाहत असल्याने अनेक ठिकाणी रस्ते, महामार्ग बंद झाले आहेत.

मुसळधार पावसामुळे ठाणे, पालघर आणि नवी मुंबईतील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मुंबई विद्यापीठाने आज होणाऱ्या परीक्षा रद्द केल्या आहेत. परीक्षांच्या नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले आहे.

पुण्यातील कामशेतजवळील वाडीवळे येथील इंद्रायणी नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने आठ गावांचा संपर्क तुटला आहे.

मराठवाड्यात जवळपास 34 प्रकल्पांतील पाणी पातळी शंभर टक्क्यांपेक्षा अधिक झाली. बुधवारी हदगाव व भोकर येथे पुराच्या पाण्यात दोन जण वाहून गेले. पैनगंगेच्या पुरामुळे विदर्भ-मराठवाड्याचा संपर्क तुटला. किनवटच्या 200 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्यात कोयना, चांदोली, धोम, वारणा आदी धरणात 40 ते 45 टक्के पाण्याचा साठा झाला आहे.

लोणावळ्यात मुसळधार पाऊस सुरू असून २४ तासात तब्बल २३४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. आत्तापर्यंत चालू वर्षात १९६९ मिमी येवढा पाऊस झाला असून तो गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक आहे. गेल्या वर्षी आत्तापर्यंत केवळ १३४८ मिमी येवढा पाऊस कोसळला होता. मावळ मध्ये देखील धुवादार पाऊस झाला असून पांढरे शुभ्र धबधबे पर्यटकांना आकर्षित करत आहेत. काही ठिकाणी रस्ता खचल्याने काही गावांचा संपर्क तुटलेला आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी कालावधीत जास्त पाऊस

पर्यटनस्थळ लोणावळ्यात धुवादार पाऊस झाला असून परिसराला अक्षरशः झोडपून काढलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी कमी अवधी मध्ये जास्त पाऊस झाला आहे. यावर्षी चालू वर्षात तब्बल 1969 मिमी येवढा पाऊस कोसळला आहे. तोच गेल्या वर्षी आत्तापर्यंत केवळ १३४८ मिमी एवढा होता. म्हणजे जून महिन्यात पावसाने दडी मारली, परंतु जुलैच्या पहिल्याच आठवड्यात जोरदार हजेरी लावत अवघ्या १२-१३ दिवसांमध्ये सर्वत्र पाणीच पाणी केलं आहे. धरण, नदी, नाले ओसंडून वाहत आहेत.