संभाजी राजेंची तब्येत बिघडली; उपोषणाने काहीही होणार नसल्याचा उदयनराजेंचा दावा
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई, दि. 28 - मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजी राजे हे आझाद मैदानावर उपोषणास बसले आहेत. मात्र उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी संभाजीराजेंची तब्येत बिघडली आहे. त्यांना उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे. मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारची औषधे घेण्यास नकार दिला आहे. आमरण उपोषणाचा त्यांचा ठाम निर्धार आहे. दुसरीकडे उदयन राजेंनी उपोषणाने काहीही होणार नसल्याचा दावा केला आहे. संभाजीराजेंच्या आंदोलनला यश कसं येणार? सरकारच उदासीन असेल तर आंदोलनाला यश कसं येणार, असा सवाल उदयनराजेंनी केला आहे. मराठा वा इतर कोणत्याही समाजातील सधन कुटुंबांना आरक्षण दिलंच जाऊ नये, असं ते म्हणाले.
डॉक्टर छत्रपती संभाजी राजेंची दिवसातून तीन वेळेस तपासणी करीत आहेत. सकाळी तपासणी केल्यानंतर डॉक्टरांना राजेंच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याचे आढळले. तसेच रक्तदाब देखील कमी झाला आहे. त्यांना अशक्तपणा आणि तीव्र डोकेदुखीची लक्षणे जाणवत आहेत. यावर डॉक्टरांनी राजे यांना इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला. मात्र, राजेंनी त्यालाही नकार दिला आहे.
संभाजीराजे यांना काही वारकरी पाठिंबा द्यायला आले होते. यावेळी अनेक अभंग वारकरी संप्रदायाने सादर केले. त्यांचं कौतुक करताना संभाजीराजे भावूक झाले. यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले. मराठा आरक्षणाप्रकरणी उपोषण करणाऱ्या संभाजीराजेंची पत्नी संयोगिता राजे यांनी विचारपूस केली. मराठा आरक्षणप्रकरणी मुख्यमंत्री आणि संभाजीराजे यांचे शिष्टमंडळ यांच्या चर्चेतून तोडगा निघेल, असा विश्वास संयोगिता राजे यांनी व्यक्त केला आहे. तर संभाजीराजेंना कुणीही मानसिक त्रास देऊ नका, अशी विनंती केली आहे.