पुण्यात चेरापुंजीपेक्षाही जास्त पावसाची नोंद (खडकवासला डॅम video)

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पुण्यात चेरापुंजीपेक्षाही जास्त पावसाची नोंद (खडकवासला डॅम video)

पुणे, (प्रबोधन न्यूज) - पुणे व आसपासच्या परिसरात जुलै महिन्यात रेकॅार्ड ब्रेक पाऊस झाल्याचं समोर आलेल्या आकडेवारी वरून पहायला मिळत आहे. 13 जुलैपर्यंत पुण्यात तब्बल 225.7 मिलीमिटर इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जगातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या ठिकाणांपैकी एक असलेल्या चेरापुंजीपेक्षाही जास्त पावसाची नोंद पुणे शहरात करण्यात आली आहे. चेरापुंजीत 13 जुलैपर्यंत 176 मिलीमिटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

राज्यात आजही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्याचं चित्र आहे. येत्या दोन दिवसामध्ये पावसाचा हा जोर असाच कायम राहण्याची शक्यता आहे. पुण्यातील जुन महिन्याची पावसाची आकडेवारी पाहिली असता, संपूर्ण जून महिन्यात केवळ 35 मिलीमिटर इतक्या कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. जून महिन्यात पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात असमाधानकारक पाऊस झाल्याने पाणीसाठ्याने तळ गाठला होता. त्यामुळे पुणेकरांवर पाणीकपातीच संकट ओढावलं होतं. पुण्याबरोबरच पिंपरी चिंचवडमध्येही पाणी कपात लागू करण्याचा विचार सुरू होता. माञ जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे पाणीकपात टळली आहे.

मात्र संपूर्ण राज्यात जुलै महिन्यात पावसाने जोर धरला असून, यंदा पुण्यात रेकॅार्ड ब्रेक पावसाची नोंद करण्यात आली आहे. 13 जुलैपर्यंत पुण्यात 225.7 मिलीमिटर इतका सर्वाधिक पाऊस पडला आहे. महत्वाचं म्हणजे जगातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या ठिकाणांपैकी एक असलेल्या चेरापुंजी पेक्षाही अधिक पावसाची नोंद ही पुणे शहरात झालेली आहे. चेरापुंजीच्या नावावर सर्वाधिक पावसाचा विक्रम नोंदवण्यात आला आहे. या बेटाला स्थानिक चक्रीवादळाचा सातत्याने फटका बसत असल्याने तेथे पावसाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. 13 जुलैपर्यंत चेरापुंजीत 176 मिलीमिटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच पुण्यात आतापर्यंत चेरापुंजीपेक्षाही अधिक पावसाची नोंद झाली आहे.

पुढील 48 तासात पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याअनुषंघाने पुण्यासोबतच पिंपरी चिंचवडमधील शाळा रविवार पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसेच आयटी कंपन्यांना वर्क फ्रॉम होम योजना लागू करण्यास सांगण्यात आले आहे. या परिसरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पिकांना मोठा फटका, दुबार पेरणीची वेळ येणार

गेल्या 5-6 दिवसांपासून पुणे जिल्ह्यातल्या भोरमधील घाटमाथ्यावर पडणाऱ्या मुसळधार पावसानं शेतकऱ्यांची दाणादाण उडवलीयं. या ठिकाणाहून वाहणाऱ्या पाण्याच्या लोंढ्यानं शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील माती वाहू गेली आहे. शेतांमधून ओढ्या नाल्याप्रमाणे पाणी वाहत असल्याचं पहायला मिळत आहे. शेतातील खाचरं तुडुंब भरून त्यांना तलावाचं स्वरूप प्राप्त झालय, शेतातील काही पीकं मातीसोबत वाहून गेली आहेत, तर काही ठिकाणी पाण्याच्या दाबामुळे भाताची रोपं मातीखाली गाडली गेली आहेत. शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील शेत जमीनीचे मोठे क्षेत्र सध्या पाण्याखाली असून, पीके कुजण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक शेतकऱ्यांवर अति पावसाने दुबार पेरणीचे संकट ओढावल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. दरम्यान पुढील काही दिवस पावसाचा जोर असाच राहिल्यास याहीपेक्षा गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान ही स्थिती केवळ एकट्या भोर तालुक्याची नाही, तर जिल्ह्यातील इतर भागात देखील मुसळधार पाऊस झाला आहे. सर्वच तालुक्यात अती पावसामुळे नुकसान झाले आहे. जून महिन्यामध्ये म्हणावा असा पाऊस जिल्ह्यात झाला नव्हता. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते. जो काही थोडाफार पाऊस झाला, त्याच पावसावर शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी केली. पीकं उगवली सुद्धा, मात्र बळीराजाच्या चेहऱ्यावरील हे समाधान फार काळ टिकू शकलं नाही. पावसाने होत्याचं नव्हत केलं. सध्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून, नद्या-नाल्यांना पूर आला आहे. अनेक ठिकाणी पुराचे पाणी शेतात शिरल्याने जमीन वाहून गेली आहे. तर काही ठिकाणी पावसाचे पाणी शेतात साचल्याने त्याचा मोठा फटका हा पिकांना बसला आहे.

भीमा नदीला आलेल्या पुरामुळे रांजणगाव सांडस व नागरगाव फाटा यांना जोडणाऱ्या मनोरम बाबा पूल नव्याने झाल्यामुळे नागरिकांची वाहतूक वर्दळ या पुलावरून होत आहे. त्यामुळे पुलाखाली पाणी असूनही हा पूल वाहतुकीसाठी खुला आहे. मुळा, मुठा व भीमा नदीच्या पुरामध्ये नदीकाठचे अनेक वीज ट्रान्सफॉर्मर वीज पंप शेतकरी वर्गाची पाईपलाईन व मीटर बॉक्स,पॅनल बॉक्स पाण्याखाली बुडाल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे तसेच नदीकाठावरील शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

https://twitter.com/i/status/1546840567811751936