पीसीईटीच्या वतीने "दहावी नंतरची शाखा निवड" या पुस्तकाचे मोफत वितरण
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - इयत्ता दहावी मध्ये मार्क कमी पडले तरी आयटीआय पासून आयआयटी पर्यंत करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तसेच रोजच नव्याने विस्तारणाऱ्या उद्योग जगतात देखील विद्यार्थ्यांना अनेक क्षेत्रात करिअर करण्याच्या संधी उपलब्ध होत आहेत त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन ज्येष्ठ लेखक व मार्गदर्शक विवेक वेलणकर यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक विद्यालयातील दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना संत तुकाराम नगर पिंपरी येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय माध्यमिक विद्यालयात झालेल्या कार्यक्रमात लेखक विवेक वेलणकर यांनी लिहिलेल्या "दहावी नंतरची शाखा निवड" या पुस्तकाचे मोफत वितरण करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण उपआयुक्त संदीप खोत, लेखक विवेक वेलणकर, पंडित दीनदयाळ उपाध्याय माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पांडुरंग मुटगन, एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी, एस. बी. पाटील कला व वाणिज्य महाविद्यालयचे मुख्याध्यापक डॉ. संदीप पाटील, पीसीईटीचे कुलसचिव योगेश भावसार, प्रा. बी. वी. माने, प्रा. स्वप्निल सोनकांबळे, डॉ. उमेश पोतदार आदी उपस्थित होते.
यावेळी वेलणकर यांनी सांगितले की, दहावी आणि बारावी मध्ये कमी मार्क मिळाले असतानाही पुढे उच्च शिक्षण घेऊन उत्तम करिअर करून, उद्योग, व्यवसाय उभारून नावारूपाला आलेल्या अनेक व्यक्ती आहेत. दहावीनंतर आर्ट, कॉमर्स, सायन्स शिवाय आयटीआय, व्होकेशनल कोर्स, डिप्लोमा, होम सायन्स, फाइन आर्ट्स, व्यवसाय शिक्षण, संरक्षण दल अशा विविध क्षेत्रात शिक्षण घेता येते. मनपा शिक्षण उपायुक्त संदीप खोत यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या एकूण १८ माध्यमिक विद्यालयातून १९३२ विद्यार्थी यावर्षी दहावी पास झाले. या सर्व विद्यार्थ्यांना पीसीईटीच्या वतीने मार्गदर्शक पुस्तक देण्यात येत आहे असा उपक्रम प्रथमच होत आहे. मनपा देखील चांगले गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक लाख रुपयांपर्यंत बक्षीस देऊन प्रोत्साहन देत असते. पंडित दीनदयाळ उपाध्याय माध्यमिक विद्यालयाचा यावर्षीचा दहावीचा निकाल ९७.३७ टक्के आहे आणि दोन विद्यार्थिनींनी मनपाचे ५० हजार रुपयांचे बक्षीस मिळवले आहे.यावेळी पीसीईटीचे कुलसचिव योगेश भावसार यांनी प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच सर्वात शेवटचा क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्याचा देखील रोख बक्षीस देऊन गौरव केला.
स्वागत मुख्याध्यापक पांडुरंग मुटगण, सूत्रसंचालन प्रा. स्वप्निल सोनकांबळे, आभार बी. वी. माने यांनी मानले.