केंद्रीय यंत्रणांनी कितीही दबाव टाकला तरी विजय आमचाच – नाना पटोले

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

केंद्रीय यंत्रणांनी कितीही दबाव टाकला तरी विजय आमचाच – नाना पटोले

मुंबई, (प्रबोधन न्यूज) - विधानपरिषद निवडणुकीकरिता महाविकास आघाडीची रणनिती तयार आहे. शिवसेना नेते खासदार संजय संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर अपक्ष येऊन भेटले त्यामुळे अपक्षांचा विषय आता संपला आहे. आमच्या उमेदवारांकडे गरजेपेक्षा जास्त मतं आहेत, असे सांगत केंद्रीय तपास यंत्रणा काही आमदारांना फोन करत आहेत. दबाव टाकला जात आहे, असा थेट आरोप काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. या फोनचे रेकॉर्डींग आमच्याकडे आहे, असा गंभीर आरोप त्यांनी भाजपवर केला आहे.

विधानपरिषद निवडणुकीकरिता विरोधकांना 22 मतं हवी आहेत.पण एवढी मतं त्यांना मिळणार नाहीत. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग, पैशांचा वापर  यांचा उपयोग आता भाजपला होणार नाही, असा टोला पटोले यांनी हाणला. त्याचवेळी ते म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणा काही आमदारांना फोन करतायेत, दबाव टाकला जातोय याचं रेकॉर्डींग आमच्याकडे आहे.

महाविकास आघाडीतल्या आमदारांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून फोन केले जात आहेत. स्विस बँकेत 2 वर्षांत 212 टक्के पैसे वाढले आहेत. मात्र, काँग्रेसला बदनाम केले जात आहे. आता सत्ता आणि पैसे कोणाकडे आहे ते सगळ्यांना माहिती आहे. भाजपचा काळा चेहरा समोर आला आहे, असे नाना पटोले म्हणाले.  ठेकेदारीने सैन्यभरती करण्यात येत आहे. अग्निपथवरुन तरुण विरोधात आहे. ही भाजपच्या पराभवाची सुरुवात आहे, असे नाना पटोले म्हणाले.

दरम्यान, अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी माझ्याशी अद्याप काँग्रेसने संपर्क केलेला नाही. मात्र, मी राष्ट्रवादी काँग्रेससोबत असून विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूनेच मतदान करणार असल्याचे स्पष्टीकरण देवेंद्र भुयार यांनी दिले. ते नागपूर येथे पत्रकारांशी बोलत होते.

भाजप नेत्यांनी आतापर्यंत माझ्याशी संपर्क केला नाही. मी कायम अजित पवार आणि राष्ट्रवादीसोबत आहे याची कल्पना भाजप नेत्यांना आहे. इतर अपक्ष आमदारही महाविकास आघाडीच्या संपर्कात आहेत. मी आताही मुख्यमंत्र्यांना भेटीसाठी वेळ मागितला आहे, पण त्यांनी अजूनही भेटीची वेळ दिलेली नाही, अशी माहितीही भुयार यांनी दिली.