पाच अल्पवयीन मुलांनी केला दारूच्या नशेत अल्पवयीन मित्राचा खून
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी (प्रबोधन न्यूज) - मोशीमध्ये काल अपहरण झालेल्या 15 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडल्याने सर्वत्र खळबळ उडाली. पोलीस तपासात त्याचा खून झाल्याचे समोर आले आहे. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे हा खून विधिसंघर्षित बालकांनी केल्याचे उघडकीस आले आहे. तसेच, त्याचे अपहरण झाले नसून, तो स्वतः या मुलांसोबत गेल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी 3 विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले असून, पोलीस इतर दोन विधिसंघर्षित बालकांचा शोध घेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कबुतराच्या ढाबळीची पाहणी करून गेल्याच्या किरकोळ कारणावरून सात ते आठ जणांच्या अल्पवयीन टोळक्यांनी एकाचा खून करण्याचा कट रचला. मात्र, ज्याला मारायचे तो आलाच नाही. सुमित याच्यासह सर्वजण दारूच्या नशेत झिंग झाले. त्यांनी गाण्याच्या तालावर नाचही केला. त्यावेळी एकाने सुमितकडे सिगारेटची मागणी केली. मात्र, त्याने सिगारेट देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या मित्रांनी सुमितच्या डोक्यात कोयत्याने वार केले. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर सर्वजण पळून गेले. ही घटना मंगळवारी (दि. 4) दुपारी जुना जकात नाका, मोशी येथे उघडकीस आली.
दरम्यान, काल 15 वर्षाच्या सुमित बनसोडे याचे अपहरण झाल्याची फिर्यादी त्याची आई मिनाक्षी बनसोडे (रा. बनकरवस्ती, मोशी) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली होती. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी या अपहरण झालेल्या मुलाचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस उपआयुक्त मंचक इप्पर व सहाय्यक पोलीस आयुक्त सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस.पांचाळ व त्यांच्या अधिनस्थ असलेल्या पोलीस पथकातील पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण यांनी तपास सुरु केला होता.
सुमितची आई परिसरात शोधाशोध करीत होती. यातील विशेष बाब म्हणजे एका आरोपी मुलगा देखील सुमितच्या आईसोबत फिरत होता. दरम्यान, मंगळवारी सकाळी पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सुमित जुना जकात नाक्याजवळ एका झाडाखाली झोपला असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असताना सुमितचा खून झाल्याचे समोर आले. पोलिसांनी संबंधित मुलाकडे चौकशी केली असता सात ते आठ जणांच्या टोळक्याने सुमितचा खून केल्याची कबुली दिली.
मयत सुमित हा सामान्य कुटुंबातील होता. पंधरा वर्षांपूर्वीच त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, त्याच्या दिव्यांग असलेल्या आईने स्कूल व्हॅनवर काम करून त्याला मोठे केले. मात्र, अलीकडे सुमित वाईट संगतीत अडकला होता. आईच्या पगारातील पैसे चोरून तो मित्रांना पार्ट्या देत असल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले. तसेच, नुकताच सुमित नुकताच दहावी नापास झाला होता.