शरद पवार यांना आणखी एक धक्का; राष्ट्रवादीच्या 4 आमदांसोबत अजित पवारांनी साधला संपर्क

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

शरद पवार यांना आणखी एक धक्का; राष्ट्रवादीच्या 4 आमदांसोबत अजित पवारांनी साधला संपर्क

     मुंबई , (प्रबोधन न्यूज )  -   रविवारी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झालाय. 2 मे म्हणजेच दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राजीनामा नाट्याने सुरु झालेल्या या नाट्याचा शेवट अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडखोरीने झाला आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. यासोबतच राजभवनात अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्रीपद देखील पुन्हा स्विकारलं आहे. या बंडानंतर शरद पवार हे वयाच्या 83 व्या वर्षी पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. हजारो कार्यकर्त्यांच्या हजेरीत कराडमध्ये पवारांचं शक्तिप्रदर्शन होणार आहे.

भाजपचं हिंदुत्व हे बेगडी हिंदुत्व आहे - अमोल मिटकरी

"सर्व पक्ष अजित पवार यांच्यासोबत आहेत. राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली नाही. त्यामुळे शरद पवार हेच आमचे आदर्श आहेत. काही कार्यकर्ते फार उतावळे असतात. काळं पुसण्याचे काम जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. भाजपचं हिंदुत्व म्हणजे हिंदुत्व आणि बाकीच्याचे हिंदुत्व नाही का? मी स्वयंसेवक संघाचा टोकाचा विरोधक आहे. आम्ही फुले शाहू आंबेडकरांचा विचार महाराष्ट्रभर सांगणारी लोकं आहोत. त्यामुळे भाजपचं हिंदुत्व हे बेगडी हिंदुत्व आहे," असे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.

अजित पवारांकडून आणखी आमदारांना संपर्क साधण्याचा प्रयत्न

रविवारपासून राष्ट्रवादीचे 40 आमदार अजित पवार यांच्यासोबत असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र यासंदर्भात त्यांनी कोणतीही भूमिका मांडलेली नव्हती. पण दोन तृतीयांश पेक्षा जास्त आमदार अजित पवार यांच्यासोबत असल्याचा दावा आहे. आजदेखील राष्ट्रवादीच्या उर्वरित आमदारांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यामध्ये मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही आमदारांचा समावेश असल्याचे म्हटलं जात आहे. विधानसभेचे अधिक आमदार आपल्या बाजूने असावेत असे अजित पवार यांचे मत आहे. अशातच चार आमदारांना अजित पवार यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. अजित पवार यांनी त्यांना मुंबईत बोलवलं आहे.